State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून विविध लाभ दिले जातात. कर्मचाऱ्यांना वेतना सोबतच विविध भत्ते मिळतात. महागाई भत्ता, घरभाडे भत्ता यांसारख्या विविध भत्याचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जातो.
यात महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. म्हणजेच सहा महिन्यानंतर महागाई भत्ता वाढवला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यापासून ही महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना लागू केली जाते. दरम्यान जानेवारी 2023 पासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे.
सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने DA चा लाभ दिला जात आहे. याआधी हा डीए 38 टक्के एवढा होता. आता जुलै महिन्यापासून देखील महागाई भत्त्यात वाढ केली जाणार आहे. जुलै महिन्यापासून आणखी चार टक्के महागाई भत्ता वाढवला जाणार आहे.
अर्थातच आता सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की महागाई भत्ता हा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकावरून ठरवला जातो. हे निर्देशांक केंद्रशासनाच्या कामगार विभागाकडून दर महिन्याला प्रसिद्ध केले जातात.
दरम्यान कामगार विभागाने जून महिन्याचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक प्रसिद्ध केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन महिन्याचा ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक हा 136.4 अंकावर पोहोचला आहे. मे महिन्याचा निर्देशांक हा 134.7 अंकावर होता, अर्थातच मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये हे निर्देशांक वाढले आहेत.
यामुळे महागाई भत्त्यात आता चार टक्के वाढ जवळपास निश्चित झाली आहे. म्हणजे जुलै महिन्यापासून चार टक्के डीए वाढवला जाणार आहे. अद्याप याची घोषणा झालेली नाही मात्र ही घोषणा लवकरच होणार आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून मिळालेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी केंद्र शासन सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता चार टक्के वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे.
याचाच अर्थ सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता वाढीचा रोखीने लाभ मिळणार आहे. तसेच महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळणार आहे. निश्चितच केंद्र शासनाने हा निर्णय घेतला तर केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे.