State Employee News : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठे आनंदाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतना संदर्भात. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुढील एप्रिल महिन्यात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा मोठा सण येत आहे.
तथा पुढील एप्रिल महिन्यात 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती राहणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्यांच्या वेतना संदर्भात अर्थातच जे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्या वेतनाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
रमजान ईद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त मार्च महिन्याचे वेतन हे कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच निर्गमित करण्याचा मोठा निर्णय झाला आहे.
यामुळे राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. विशेष बाब अशी की याबाबतचे शासन परिपत्रक देखील निर्गमित करण्यात आले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने याबाबतचे परिपत्रक निर्गमित केले असून पुढील महिन्यात 10 आणि 11 एप्रिल ला असणाऱ्या रमजान ईद या सणाच्या पार्श्वभूमीवर आणि त्यानंतर 14 एप्रिलला असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनाच्या निमित्ताने राज्य कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मार्च महिन्याचे वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या संदर्भात शिक्षण आयुक्तालय पुणे यांच्या मार्फत 19 मार्च 2024 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक निर्गमित झाले आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे यात शंकाच नाही.
या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यात येणाऱ्या सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही अशी आशा आहे. परिणामी शिक्षण आयुक्तालयाच्या या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केव्हा वाढणार ?
दुसरीकडे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याबाबत अजूनही राज्य शासनाने निर्णय घेतलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी पाहायला मिळत आहे. खरे तर आचारसंहितापूर्व याबाबत सकारात्मक निर्णय होईल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील 46 टक्क्यांवरून 50% होईल अशी आशा होती.
राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्के वाढविण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होऊ शकला नाही. तथापि याबाबतचा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच घेतला जाईल अशी शक्यता आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जानेवारी 2024 पासून 50% होणार आहे. याबाबतचा निर्णय मात्र जून महिन्यात होईल, अशी शक्यता आहे. यामुळे जून महिन्यापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.