State Employee News : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांचे तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन हे वेळेआधी मिळणार आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील सेवेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि निवृत्तीवेतनधारकांचे तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे वेतन हे वेळेआधीच मिळणार आहेत. महाराष्ट्र समवेतच केरळ राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना देखील वेळेआधी वेतन आणि पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे.
केरळ मधील ओनम आणि महाराष्ट्रातील गणेश चतुर्थी या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, आपल्या राज्यात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. याव्यतिरिक्त ओनम हा केरळमध्ये साजरा होणारा एक महत्त्वाचा सण आहे.
अशा परिस्थितीत या दोन सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि या सणाचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंद घेता यावा यासाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि सेवानिवृत्त पेन्शन धारकांचे वेतन वेळेआधी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब अशी की केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे.
या वित्त मंत्रालयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, ओणम या केरळ मधील अतिमहत्त्वाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर, यावेळी केरळमधील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार वेळेआधीच होणार आहेत. केरळ राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार 25 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहेत.
निश्चितच 25 ऑगस्टला केरळ मधील कर्मचाऱ्यांना पगार मिळणार असल्याने त्यांना ओनम सण मोठ्या उत्साहात साजरा करता येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्तीवेतनधारकांचे तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे निवृत्ती वेतन 27 सप्टेंबर 2023 रोजी दिले जाणार आहे.
यामुळे गणेश चतुर्थीचा सण आपल्या राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठ्या उत्साहात साजरा करता येईल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. दरम्यान अर्थ मंत्रालयाकडून यासंबंधीत राज्यातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेळेआधी वेतन देण्यासाठी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.
याव्यतिरिक्त केरळ सरकारने त्यांच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना ओनम सणाच्या पार्श्वभूमीवर 4000 रुपयाचा बोनस देखील जाहीर केला आहे. निश्चितच सरकारचा हा निर्णय या संबंधित कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायद्याचा राहणार असून यामुळे सणासुदीच्या दिवसात संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.