State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल, शासकीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून कोणी शासकीय सेवेत असेल तर आजची ही बातमी तुम्ही नक्कीच वाचा. खरतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध नियम शासनाकडून बनवले जातात.
या नियमांचे पालन कर्मचाऱ्यांसाठी बंधनकारक असते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचा निर्णय निर्गमित झाला आहे.
या नवीन निर्णयानुसार या संबंधित बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बँकेतील खातेदारांशी मोबाईलवर किंवा कार्यालयीन दूरध्वनीवर बोलताना हॅलो ऐवजी आता वंदे मातरम बोलावे लागणार आहे. याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.
बँकेच्या संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिला आहे. राज्यभरातील बँकेच्या व्यवस्थापकांसाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
जसं की आपणास ठाऊकच आहे की एसटी बँकेवर एडवोकेट गुणरत्न सदावर्तेच्या पॅनलने सत्ता मिळवली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत सदावर्ते यांचा पॅनल निवडून आला आहे.
आता या नवोदित संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असून कर्मचाऱ्यांमध्ये देशप्रेम जागृत राहावे यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये देखील या निर्णयाचे स्वागत होत आहे. वास्तविक, राज्यभरात या बँकेच्या शाखा आहेत.
प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या बँकेच्या शाखा असून या बँकेत एसटीचे चालक आणि वाहकांचे खाते आहेत. विशेष म्हणजे एसटीच्या बहुतांशी कर्मचाऱ्यांचे पगार या बँकेतून केले जातात. पगारानंतर एसटी कर्मचाऱ्यांना पैसे काढण्यासाठी बँकेकडून एटीएम देखील दिले जात आहे.
दरम्यान, आता या बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फोन आल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे लागणार आहे.एकंदरीत आतापर्यंत या एसटी महामंडळाच्या बँकेत फोन केल्यावर तेथील कर्मचारी हॅलो म्हणत होते मात्र आता त्यांना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे लागणार आहे.