State Employee News : जर तुम्हीही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल आणि राज्य शासकीय कर्मचारी म्हणून सरकारी सेवा बजावत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. खरेतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाने सुधारित पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी होती. सरकारने मात्र यावर उतारा म्हणून सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प राज्य कर्मचाऱ्यांना दिलेला आहे.
यानुसार जे नवीन पेन्शन योजना धारक राज्य कर्मचारी सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प निवडतील त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% एवढी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे. यावर महागाई भत्ता वाढीचा देखील लाभ मिळणार आहे. तसेच कौटुंबिक निवृत्तीवेतन म्हणून सदर राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या 60% एवढी कौटुंबिक पेन्शन म्हणून देण्याचे प्रावधान या योजनेत राहणार आहे.
तथापि या सुधारित पेन्शन योजनेत जुन्या पेन्शन योजनेतील अनेक गोष्टी वगळल्या गेल्या आहेत. यामुळे काही कर्मचाऱ्यांनी सुधारित योजनेचा देखील विरोध केला आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेपेक्षा ही योजना कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचा दावा केला असून त्यांनी या योजनेला सपोर्ट केला आहे.
या सुधारित पेन्शन योजनेमुळे जुनी पेन्शनचा मुद्दा निकाली निघाला आहे असा दावा शासनाने केलाय. दुसरीकडे, राज्य कर्मचाऱ्यांची आणखी एक महत्त्वाची मागणी अर्थातच सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी देखील लवकरच पूर्ण होऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. वास्तविक नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.
19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचे मतदान संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात आणि आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात होणार आहे. 4 जून 2024 ला लोकसभा निवडणुकीचा रिझल्ट समोर येणार आहे.
यामुळे चार जूनला कोणत सरकार केंद्रात येतं हे ठरणार आहे. दरम्यान लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेनंतर अवघ्या तीन ते चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार असा अंदाज आहे.
अशा परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्ष करेल असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. विशेष म्हणजे देशातील इतरही अनेक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष एवढे आहे.
परंतु महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ग्रुप अ, ब आणि क संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे यामुळे सदर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे सेवानिवृत्तीचे वय आणखी दोन वर्षांनी वाढवले गेले पाहिजे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरण्यात आली असे.
विशेष म्हणजे दस्तूरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि लवकरात लवकर याविषयी सकारात्मक असा निर्णय घेऊ असे आश्वासन नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिलेले आहे.
अशा परिस्थितीत लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे सरकार याबाबतचा सकारात्मक निर्णय घेईल आणि राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवेल अशा चर्चा सध्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता चार जून 2024 नंतर अर्थात लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिंदे सरकार या मुद्द्यावर काय निर्णय घेते हे खरंच पाहण्यासारखे राहणार आहे.