State Employee Retirement Age : मागील काही वर्षांपासून महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून 2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय वाढवले पाहीजे अशी देखील मागणी केली जात आहे. खरंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहे. देशातील इतरही अनेक राज्यांमध्ये तेथील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.
अशा स्थितीत महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे केले पाहिजे अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे. सध्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. म्हणजे यामध्ये आणखी दोन वर्षांची वाढ व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांची आहे.
दरम्यान कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय होऊ शकतो असा दावा काही मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पुढल्या वर्षी होणारी विधानसभा निवडणुक. खरंतर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पुढील वर्षी अर्थात 2024 मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे.
अशा परिस्थितीत निवडणुकीचे पडघम आत्तापासूनच वाजू लागले आहेत. शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यामुळे निवडणुकीचा हंगाम पाहता राज्य कर्मचाऱ्यांना देखील वर्तमान सरकार नाराज करणार नाही आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल असा आशावाद काही जाणकार लोकांनी व्यक्त केला आहे.
सरकार सेवानिवृत्तीचे वय का वाढवू शकते
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत 17 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी तीन टक्के कर्मचारी दरवर्षी रिटायर होत आहेत. पण राज्य शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागते.
दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होतात अर्थातच 60 हजार कर्मचारी निवृत्त होतात. आता या निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्यूटी म्हणून सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयाचा खर्च करावा लागतो. तसेच लगेच पेन्शन देखील सुरू करावी लागते.
यामुळे जर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केले तर राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4 हजार कोटी रुपये वाचणार आहेत. त्यामुळे राज्य सरकार लवकरच सेवानिवृत्तीचे वय वाढवणार असे बोलले जात आहे.
मात्र याबाबतचा निर्णय राज्य सरकारने लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. म्हणून आता वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकार यावर सकारात्मक निर्णय घेते का आणि त्याबाबतचा निर्णय केव्हा होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.