State Government Employee News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील काही कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने कृषी विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर कृषी सेवकाला शेती विकासाचा कणा म्हणून ओळखले जात आहे.
मात्र या कृषी सेवकांना आतापर्यंत खूपच तुटपुंजे मानधन मिळत होते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कृषी सेवक हे पद 2004 मध्ये तयार करण्यात आले. त्यावेळी कृषी सेवकांना 2,500 रुपयांचे मानधन दिले जात होते. यानंतर 2009 मध्ये म्हणजे हे पद तयार झाल्यानंतर पाच वर्षांनी कृषी सेवकांच्या मानधनात वाढ झाली. त्यावेळी कृषी सेवकांचे मानधन सहा हजार रुपये करण्यात आले.
तेव्हापासून ते आजतागायत कृषी सेवकांचे मानधन सहा हजार रुपये प्रति महिना एवढे होते. यामुळे कृषी सेवकांच्या वेतनात वाढ व्हावी अशी मागणी केली जात होती. यासाठी विविध संघटनांनी शासनाकडे पाठपुरावा केला. संबंधित कर्मचाऱ्यांनी देखील एवढ्याशा मानधनात या महागाईच्या काळात उदरनिर्वाह भागवता येत नसल्याने मानधनातं वाढ द्यावी अशी मागणी केली.
दरम्यान, कृषी सेवकांच्या मानधनाबाबत निर्णय घेण्यासाठी 2022 मध्ये राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वाच्या बैठकीच्या आयोजन झाले. 22 सप्टेंबर 2022 ला मुख्य सचिवांनी बैठक घेतली होती. या बैठकीत कृषी सेवकांच्या मानधन वाढीबाबत निर्णय झाला.
दरम्यान या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आणि राज्य मंत्रिमंडळाने कृषी सेवकांच्या मानधन वाढीस मंजुरी दिली. यानुसार कृषी सेवकांचे मानधन सहा हजार रुपयांवरून 16 हजार रुपये करण्यात आले. अर्थातच कृषी सेवकांच्या मानधनात दहा हजार रुपये प्रति महिना एवढी वाढ करण्यात आली आहे.
कृषी सेवकांच्या माध्यमातून राज्य शासनाने घेतलेल्या या कौतुकास्पद निर्णयाचे स्वागत केले जात आहे. निश्चितच, गेल्या चौदा वर्षांपासून अतिशय कमी मानधनमध्ये काम करणाऱ्या कृषी सेवकांना शासनाच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.