Steel Rate Decrease : जर तुम्हीही आगामी काळात घर बांधण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. घरांच्या किमती वाढण्यामागे वेगवेगळे घटक कारणीभूत आहेत. यातीलच एक महत्त्वाचा घटक म्हणजे बिल्डिंग मटेरियल. बिल्डिंग मटेरियलचे दर सातत्याने वाढत असल्याने घर बांधणे आता सर्वसामान्यांच्या स्वप्नापलीकडील गोष्ट बनली आहे.
पण, जर तुम्हाला स्वस्तात घर बांधायचे असेल तर सध्याचा काळ हा तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. कारण की घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्टीलच्या दरात आता मोठी कपात झाली आहे. स्टील म्हणजेच सळईचे दर गेल्या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नरमले आहेत.
यामुळे जर तुम्हाला आगामी काळात घर बांधायचे असेल तर आत्ताच तुम्ही स्टीलची खरेदी करून ठेवायला काही हरकत नाही. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सळईच्या दरात प्रति टन जवळपास पाच ते सहा हजार रुपयांची घसरण झाली आहे.
यामुळे घर बांधू इच्छिणाऱ्या नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. सळईचे दर फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील कानाकोपऱ्यात कमी झाले आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी तथा महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईत सुद्धा सळईचे दर कमी झाले आहेत.
तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे. पावसाळी सीझनमध्ये दरवर्षी बांधकाम व्यवसायाला फटका बसत असतो. या काळात अनेकजण बांधकाम थांबवतात. या काळात सातत्याने पाऊस पडतो अन यामुळे बांधकाम करताना अडथळा येतो.
शिवाय सिमेंट, रेती यांसारख्या मटेरियल चे नुकसान होते. हेच कारण आहे की पावसाळ्यात बांधकाम व्यवसाय मंदावतो. यंदाही पावसाळ्याचा सीजन सुरू झाल्यापासून बांधकाम व्यवसाय मंदावला आहे.
हेच कारण आहे की स्टीलच्या दरात आता प्रति टन मागे पाच ते सहा हजारांची घट पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत आज आपण देशातील प्रमुख शहरांमधील सळईचे भाव थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सळईचे भाव कसे आहेत ?
दिल्ली : देशाची राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सध्या 42,500 रुपये प्रति टन या दराने स्टीलची विक्री होत आहे.
मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या दोन महिन्यांपूर्वी 53,200 रुपये प्रति टन या दराने विक्री होणाऱ्या स्टीलच्या किमतीत मोठी घसरण झाली असून सध्या 45,400 रुपये/टन या दराने स्टीलची विक्री होत आहे.
जालना : जालन्यामध्ये दोन महिन्यांपूर्वी स्टील ला 52,200 रुपये/टन असा भाव मिळत होता. सध्या या ठिकाणी स्टीलचे दर 45,500 रुपये/टन असे आहेत.
चेन्नई : दोन महिन्यांपूर्वी चेन्नईमध्ये स्टीलचे दर 52,500 रुपये/टन असे होते. पण आता यात घसरण झाली असून 47,500 रुपये/टन या दराने येथे स्टीलची विक्री सुरू आहे.
हैद्राबाद : हैदराबाद मध्ये सध्या 43,000 रुपये प्रति टन या दराने स्टील विक्री सुरू आहे.
जयपुर : राजस्थानची राजधानी जयपूर येथे देखील स्टीलच्या दरात घसरण झाली असून सध्या या ठिकाणी 44,600 रुपये प्रति टन या दराने स्टीलची विक्री केली जात आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे ही स्टीलच्या दरात घसरण झाली असून या ठिकाणी सध्या 42,000 रुपये प्रति टन या दराने स्टीलची विक्री सुरू आहे.