Success Story : अगर किसी चीज को शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हे उससे मिलाने में लग जाती है ! असं आपण नेहमीं म्हणतं असतो. याची अनेक उदाहरणे देखील आपल्याला पाहायला मिळतात. विजय संकेश्वर यांनी देखील ही गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे. विजय संकेश्वर हे नाव भारतासाठी अपरिचित नाही. संकेश्वर हे व्ही आर एल लॉजिस्टिकचे मालक आहेत. आज या लॉजिस्टिक कंपनीकडे पाच हजाराहून अधिक गाड्या आहेत. यामुळे संकेश्वर यांना ट्रकिंग किंग म्हणून ओळखले जाते.
विशेष म्हणजे पाच हजाराहून अधिक गाड्या असणाऱ्या या कंपनीचे नाव लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील आहे. मात्र हे यश आता दैदीप्यमान भासतयं कारण की, यासाठी घेतलेली मेहनत ही खूपच खडतर आहे. मीडिया रिपोर्ट नुसार, संकेश्वर यांनी ज्यावेळी त्यांच्या या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नव्हते. खरंतर घरचा आधीच व्यवसाय होता.
मात्र परिवाराच्या व्यवसायात आपल्याला उतरायचे नाही अशी खूणगाठ त्यांनी बांधली होती. यामुळे त्यांनी आपण काहीतरी नवीन करायचे या हेतूने पैसे उसने घेऊन एक ट्रक खरेदी केली. यातून मग माल वाहून नेण्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. आज त्यांच्याकडे 5000 वाहने आहेत. यामुळे त्यांना देशात ट्रकिंग किंग म्हणून ओळखले जात आहे. पण त्यांच्या या यशाच्या प्रवासात अनेक अडचणीही आल्या.
घरच्यांशीही भांडावं लागलं. मात्र निश्चयाचा महामेरू असलेल्या संकेश्वर यांनी हार मानली नाही. त्यांच्या या प्रवासात आलेल्या विविध अडचणींवर त्यांनी यशस्वी मात केली आहे. आज ते खूप मोठे व्यक्ति बनले आहेत. त्यांच्यावर एक चित्रपटही बनला आहे. निश्चितच, आता तुम्हाला संकेश्वर यांची ही यशोगाथा जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल, चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया विजय संकेश्वर यांच्या या प्रेरणादायी प्रवासाबाबत.
देशातील सर्वाधिक मोठ्या लॉजिस्टिक कंपनीचे मालक कसे बनलेत
VRL लॉजिस्टिक ही आज देशातील एक अग्रणी लॉजिस्टिक कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात संकेश्वर यांनी सन 1976 साली केली होती. विशेष बाब अशी की त्यांनी हा व्यवसाय केवळ 1 ट्रक विकत घेऊन केली. खरतर संकेश्वर यांचे संपूर्ण कुटुंब हे व्यवसायात आहे. संपूर्ण कुटुंब हे व्यावसायिक असतानाही मात्र त्यांनी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात उतरणार नाही असं ठरवलं होतं.
त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाशी निगडित आहे. पण वडिलोपार्जित व्यवसाय करायचा नाही असं त्यांनी ठरवलं. यामुळे त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला. तू नवीन व्यवसाय करू नकोस आपल्या परंपरागत व्यवसायातच आपलं करिअर घडव असं त्यांच्या घरच्यांनी त्यांना सांगितलं.
यामुळे साहजिकच त्यांना त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी घरच्यांकडून अपेक्षित असे पाठबळ मिळाले नाही. म्हणून त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पण कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन, मनात यशस्वी होण्याची अमाप जिद्द घेऊन संकेश्वरने लॉजिस्टिकच्या व्यवसाय सुरुच केला. आज संकेश्वर या व्यवसायात भारतातील सर्वाधिक मोठी व्यक्ती आहे असे म्हणायला हरकत नाही.
यामुळे त्याच्या कुटुंबाला त्याचा खूप अभिमान आहे. यावेळी देशातील बड्या श्रीमंतांमध्ये विजय संकेश्वर यांचे नाव घेतले जात आहे. विजय संकेश्वर यांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ आता त्यांना मिळाले आहे. आता या कंपनीकडे सुमारे 5000 व्यावसायिक वाहने आहेत. हा देखील एक विक्रम आहे, ज्यामुळे कंपनीचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे.
संकेश्वर यांच्या जीवनावर विजयानंद नावाची एक कन्नड फिल्म बनवण्यात आली आहे. या मूवी मध्ये संकेश्वर यांच्या जीवनातील चढ उताराला दाखवण्यात आले आहे. जी की नव्याने व्यवसायात उतरलेल्या प्रत्येक व्यवसायिकासाठी मोठी प्रेरणादायी सिद्ध होऊ शकते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की संकेश्वर यांची व्हीआरएल लॉजिस्टिक कंपनी शेअर बाजारात देखील सूचीबद्ध आहे.
विशेष बाब म्हणजे त्यांच्या या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. गेल्या 5 वर्षांत या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 115.05 टक्के परतावा दिला आहे. सध्या त्यांच्या कंपनीचा शेअर 702 रुपयांवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 6142 कोटी रुपयांची आहे.
एकंदरीत एका ट्रक पासून सुरू केलेला हा व्यवसाय 6142 कोटी रुपयांपर्यंत पोहोचवून खऱ्या अर्थाने विजय संकेश्वर यांनी व्यवसायात कशा पद्धतीने विजयी होता येतं हे दाखवून दिल आहे. त्यांचा हा व्यवसायातला प्रवास निश्चितच नव्याने व्यवसायात उतरणाऱ्या व्यावसायिकांना प्रेरणा देईल यात शंकाच नाही.