Sugarcane Farming Maharashtra : ऊस हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक. राज्यात ऊस लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण ऊस पिकावरच अवलंबून आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी उसाचा गोडवा गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे वेगवेगळी आव्हाने समोर आली आहेत. मजूरटंचाई, ऊसतोड मजुरांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक, अतिरिक्त उसाचा प्रश्न, एफ आर पी वेळेत न मिळणे यांसारख्या एक ना अनेक संकटांमुळे ऊस उत्पादक शेतकरी भरडला जात आहे. अशातच मात्र देशभरातील जवळपास पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे.
काल अर्थातच 28 जून 2023 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऊस उत्पादकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत 2023-24 या हंगामासाठी उसाच्या एफआरपीत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे.
अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2023-24 या हंगामासाठी उसाच्या एफआरपीत प्रतिक्विंटल दहा रुपये वाढ करण्याचा अर्थातच टनामागे शंभर रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ आता उसासाठी 315 रुपये प्रति क्विंटल एवढी एफ आर पी राहणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ऊसाचा किमान हमीभाव ठरवला जातो. उसाचा किमान हमीभाव अर्थातच एफआरपी गेल्या हंगामासाठी 305 रुपये प्रति क्विंटल एवढी होती.
आता यामध्ये प्रति क्विंटल दहा रुपये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार, आता ऊसाला प्रतिक्विंटल 315 रुपये एवढी एफआरपी मिळणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या पाच लाख लोकांना दिलासा मिळणार असल्याचा दावा केंद्र शासनाने केला आहे.