Supreme Court On Property Rights : भारतात संपत्तीच्या कारणावरून नेहमीच वाद विवाद पाहायला मिळतात. कायद्याची भाषा ही सर्वसामान्यांना लवकर उमगत नाही यामुळे संपत्तीच्या कारणावरून वादविवाद होत असतात. अनेक वाद-विवाद कोर्टात जातात आणि मग कोर्टातून या अशा प्रकरणांमध्ये योग्य तो निर्णय भेटत असतो.
दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने अशाच एका संपत्तीच्या प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. सासू-सासर्यांनी स्वतः कमावलेल्या प्रॉपर्टीत सुनेला किती अधिकार मिळू शकतो याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
माननीय सुप्रीम कोर्टाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात अलीकडेच असे म्हटले आहे की, सुनेला पतीच्या आई-वडिलांच्या घरात राहण्याचा संपूर्ण अधिकार आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय रद्द केला आहे.
कोर्टाने आपल्या या नवीन निर्णयात म्हटले आहे की, घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या पत्नीला तिच्या पतीच्या पालकांच्या घरात म्हणजे तिच्या सासू-सासर्यांच्या घरात राहण्याचा पूर्ण अधिकार राहणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील आपल्या निर्णयात स्पष्टपणे म्हटले आहे की, पीडित पत्नीला सासरच्या घरात केवळ राहण्याचा कायदेशीर अधिकार असेल आणि तिच्या पतीने घेतलेल्या मालमत्तेवर अर्थात स्वतंत्रपणे बांधलेल्या घरावर तिचा हक्क हा राहणारच आहे.
माननीय सर्वोच्च न्यायालयाने या नव्याने दिलेल्या निकालात, आपल्या 150 पानांच्या निर्णयात घरगुती हिंसाचार कायदा 2005 चा हवाला देऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
हा निकाल देताना माननीय न्यायालयाने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय पालटला आहे. तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने म्हटले होते की, कायद्यानुसार मुलींना त्यांच्या पतीच्या पालकांच्या मालकीच्या मालमत्तेत राहता येत नाही.
पण आता सर्वोच्च न्यायालयाने या तीन सदस्यीय खंडपीठाने तरुण बत्रा यांचा निर्णय रद्द करत 6-7 प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सुनेचा केवळ पतीच्या स्वतंत्र मालमत्तेतच नव्हे तर सामायिक घरातही हक्क असल्याचे या प्रकरणात न्यायालयाने म्हटले आहे.
या प्रकरणात घरगुती हिंसाचाराने पीडित असलेल्या सुनेला आपल्या सासू-सासर्यांच्या घरात राहता येणार असा निकाल दिला आहे. यावरून सुनेला पतीच्या स्वातंत्र्य मालमत्तेत अधिकार तर मिळतोच शिवाय पती ज्या मालमत्तेत सामायिक आहे अशा घरातही हक्क मिळतो हे स्पष्ट होत आहे.