Surat Chennai Greenfield Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये देशात रस्ते विकासाची अनेक प्रकल्प पूर्ण झाली आहेत. महामार्गांचे जाळे तयार करण्यासाठी आणि शहरा-शहरांमधील अंतर कमी व्हावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने भारतमाला परियोजनेअंतर्गत देशभरात हजारो किलोमीटरचे महामार्ग प्रस्तावित केले आहेत.
यापैकी अनेक महामार्ग पूर्ण झाले आहेत, काही महामार्गांचे काम अजून सुरू आहे, तर काही महामार्गांचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यामध्ये सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड महामार्गाचा देखील समावेश होतो.
हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर सुरत ते चेन्नई हा प्रवास गतिमान होणार आहे. हा मार्ग आपल्या महाराष्ट्रातूनही जात आहे. त्यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था देखील आधीच्या तुलनेत मजबूत होईल अशी आशा आहे.
दरम्यान, सुरत-चेन्नई ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे. खरे तर या महामार्गाला नाशिक जिल्ह्यात विरोध होत होता.
नासिक तालुक्यातील तीन गावांमधील शेतकऱ्यांनी या महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळत नसल्याने विरोध दाखवला होता.
तालुक्यातील ओढा, लाखलगाव व विंचूर गवळी या तीन गावांमधील 36 शेतकऱ्यांनी मार्गाच्या मूल्यांकनाबाबत तक्रार केली होती. जुन्या झाडांचे मूल्यांकन, विहीर-पाईपलाईन यांचे मूल्यांकन कमी झाल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली होती.
दरम्यान शेतकऱ्यांच्या या सर्व तक्रारी आता निकाली काढण्यात आल्या आहेत. यामुळे या तिन्ही गावातील शेतकऱ्यांनी 40 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासं संमती दाखवली आहे. आता या प्रकल्पाचे काम अधिक जलद गतीने होईल अशी आशा आहे.
भूसंपादनासाठी संबंधितांनी संमती दाखवली असल्याने आता या प्रकल्पाचे भूसंपादन जलद गतीने पूर्ण होईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात या प्रकल्पाचे काम सुरू होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.
हा मार्ग नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील सत्तर गावांमधून जाणार आहे. या मार्गाची जिल्ह्यात 122 किलोमीटर एवढी लांबी राहणार आहे.
जिल्ह्यात या मार्गाची सुरुवात सुरू करण्याच्या राक्षसभवन येथे होणार आहे आणि सिन्नर तालुक्याच्या वावी येथे या सहापदरी महामार्गाचे जिल्ह्यातील शेवटचे टोक राहणार आहे.