Suryoday Solar Scheme:- सध्या सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात येत आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर पंतप्रधान कुसुम योजना व या सोबत महाराष्ट्र राज्य सरकारच्या देखील काही योजना आहेत. या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते.
या सगळ्या योजनांमध्ये आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची भर पडली असून या माध्यमातून आता घराच्या छतावर सौर पॅनल बसवून प्रत्येक घराने वीजबिल कमी करण्याकरिता आणि त्यांना विजेची जी काही गरज आहे त्यामध्ये स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना खूप महत्त्वाची आहे.
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून आता जे व्यक्ती कमी आणि मध्यम उत्पन्न गटातील आहेत त्या व्यक्तींना आता रूप-टॉप सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध करून देणे तसेच त्यांना जास्तीची वीजनिर्मितीसाठी अतिरिक्त उत्पन्नाची संधी उपलब्ध करून देणे हा दृष्टिकोन ठेवण्यात आलेला आहे. जे रहिवासी क्षेत्रातील ग्राहक आहेत त्यांनी छतावरील सौर ऊर्जेच्या मोठ्या प्रमाणावर अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यासाठी ही व्यापक राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याचे निर्देश देखील पंतप्रधानांनी दिले आहेत.
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश
यामध्ये आता महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांच्या पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात आता या माध्यमातून 25000 सोलर पॅनलचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यातून तब्बल पावणे दोन लाख सोलर 31 मार्च 2024 पर्यंत बसवण्याची मुदत देण्यात आली आहे.
यामध्ये राज्यातील पुणे, नासिक तसेच नांदेड, लातूर, नागपूर, अकोला आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात आता 25000 घरांच्या छतावर हे सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत. ह्या सौर पॅनलकरिता 40 टक्क्यांपर्यंत अनुदान केंद्र शासनाकडून देण्यात येणार आहे.
हे सौर पॅनल बसवण्यासाठी कोणत्या गोष्टींची आहे आवश्यकता?
समजा या योजनेअंतर्गत 1 KW चे सौर पॅनल बसवायचे असेल तर त्याकरिता दहा चौरस मीटर जागा असणे गरजेचे आहे. घराशिवाय ऑफिस आणि कारखान्यांच्या छतावर सौर पॅनल बसवले तर विजेच्या खर्चामध्ये बचत होणार असून जवळजवळ हा खर्च 30 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.
एवढेच नाही तर नागरिकांनी जर तीन किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवले तर त्यामध्ये 40 टक्के सवलत मिळणार आहे व तीन किलोवॉट ते दहा किलो वॅट सोलर पॅनल बसवायचे असेल तर 20 टक्क्यांची सवलत दिली जाणार आहे.
तुम्हाला घ्यायचा या योजनेचा लाभ तर असा करा अर्ज
केंद्र सरकारच्या या मोफत सोलर रूफटॉफ योजनेअंतर्गत ज्या नागरिकांना घरावर सौर पॅनल बसायचे असेल त्यांनी solarrooftop.gov.in अधिकृत वेबसाईटवर या योजनेतून ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे. या अर्जांच्या आधारेच या योजनेच्या माध्यमातून सोलर रूफटॉफ साठी लाभ दिला जाणार आहे.
तसेच त्यासोबतच सौर रूफटॉप योजना ऑनलाइन लागू करण्याकरिता महावितरणच्या https://css.mahadiscom.in/ या वेबसाईटवर ग्राहक क्रमांक म्हणजेच कंजूमर नंबर टाकून अर्ज करणे गरजेचे आहे. तसेच हा अर्ज तुम्ही कॉमन सर्विस सेंटर अर्थात सीएससी केंद्रावर जाऊन देखील भरू शकतात.