FD News : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात एफडी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजचा हा लेख खूपच कामाचा राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील अशा टॉप तीन बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की सीनियर सिटीजन ग्राहकांना FD साठी खूपच चांगले व्याजदर देत आहेत.
खरंतर एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिट करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचे कारण म्हणजे आता बँकांच्या माध्यमातून एफडी करणाऱ्यांना चांगला परतावा दिला जात आहे. विशेष म्हणजे सामान्य ग्राहकांपेक्षा आता ज्येष्ठ नागरिकांना बँकांच्या माध्यमातून अधिकचे व्याजदर दिले जात आहे.
यामुळे अलीकडे सीनियर सिटीजन ग्राहक एफडी मध्ये अधिक गुंतवणूक करत असल्याचे दिसत आहे. महिला वर्ग देखील मुदत ठेव योजनेत आपला पैसा गुंतवत आहेत. दरम्यान आता आपण जेष्ठ नागरिकांना सर्वाधिक व्याज देणाऱ्या टॉप तीन बँकांची माहिती पाहणार आहोत.
DCB बँक : डीसीबी बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर बँक जेष्ठ नागरिकांना 25 ते 26 महिन्यांच्या कालावधीतील मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज परतावा देत आहे. या कालावधीच्या एफ डी साठी ज्येष्ठ नागरिकांना 8.6 टक्के व्याजदर मिळतं आहे.
IDFC फर्स्ट बँक : या बँकेकडूनही ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा अधिकचा व्याज परतावा दिला जात आहे. 500 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर ही बँक ज्येष्ठ नागरिकांनां सर्वाधिक व्याज परतावा देत आहे. या कालावधीच्या एफडीवर सीनियर सिटीजन ग्राहकांना 8.5 टक्के व्याजदराचा लाभ मिळतं आहे.
बंधन बँक : ज्या सीनियर सिटीजन ग्राहकांना कमी कालावधीसाठी एफडी करायची असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल त्यांच्यासाठी बंधन बँकेची 360 दिवसांची एफबी योजना फायदेशीर ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका वर्षात परिपक्व होणाऱ्या एफडीवर बंधन बँक ज्येष्ठ नागरिकांना ८.३५ टक्के व्याजदराने परतावा देत आहे.
IndusInd बँक : मिळालेल्या माहितीनुसार इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना एक ते दोन वर्षांत परिपक्व होणाऱ्या FD वर सर्वाधिक परतावा देत आहे. या कालावधीच्या मुदत ठेवीसाठी 8.25 टक्के एवढे व्याजदर दिले जात आहे.
येस बँक : ही बँक देखील कमी कालावधीच्या एफडीवर आपल्या ग्राहकांना चांगला परतावा देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्ष कालावधीपासून म्हणजेच 18 महिने ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदतीच्या FD वर ही बँक 8.25% व्याजदराने परतावा देत आहे.