Third Mumbai News : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. हे महाराष्ट्राच्या राज्य राजधानीचे शहर आहे. जगातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून या शहराचा उल्लेख होतो. याशिवाय या शहराची लोकसंख्येची घनता ही सर्वाधिक आहे. म्हणजेच कमी जागेत अधिक लोक येथे वास्तव्याला आहेत. हे गर्दीचे आणि खूपच व्यस्त शहर आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे या शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वधारत आहे. यामुळे मुंबईमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांवर मोठा ताण आला असून मुंबईकरांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. दरम्यान या समस्येवर उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने आता मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील आणि इतर मूलभूत सुविधांवरील ताण कमी व्हावा यासाठी नवीन मुंबई म्हणजेच तिसरी मुंबई शहर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मान्यता देखील दिलेली आहे. यामुळे आता मुंबई शहराला लागून नवीन तिसरी मुंबई बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईमधील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प अर्थातच अटल सेतूचे उद्घाटन केले आहे. हा सेतू देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आहे. या अंतर्गत एकूण 22 km लांबीचा ब्रिज तयार करण्यात आला असून यापैकी 16.5 किलोमीटर लांबीचा ब्रिज हा समुद्रावर राहणार आहे.
तसेच उर्वरित अंतर हे जमिनीवर असेल. या सागरी ब्रिजमुळे मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास फक्त आणि फक्त 20 ते 25 मिनिटांच्या काळात पूर्ण होऊ शकणार आहे.म्हणजेच प्रवाशांचा वेळ आणि पैसा याची बचत होणार आहे.
दरम्यान ज्याच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नजीक या नव्या मुंबईची पायाभरणी केली जाणार आहे. तिसरी मुंबईला हा अटल सेतू खूपच फायदेशीर ठरणार असून नव्याने विकसित होणारे या शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या सेतूवरच अवलंबून राहणार आहे.
मात्र अनेकांच्या माध्यमातून नव्याने विकसित होणारी तिसरी मुंबई हे शहर सध्या अस्तित्वात असलेल्या शहरापेक्षा मोठे असेल की लहान? हा सवाल उपस्थित केला जात होता. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की तिसरी मुंबईचे क्षेत्रफळ हे सध्याच्या मुंबईपेक्षा निम्म्याने कमी राहणार आहे.
नव्याने विकसित होणाऱ्या शहराचे क्षेत्रफळ 323 वर्ग किलोमीटर एवढे आहे. मात्र सध्याच्या मुंबईचे क्षेत्रफळ 603 वर्ग किलोमीटर एवढे आहे. या तिसऱ्या मुंबईत जवळपास 200 गावांचा समावेश होणार आहे. उलवे, पेन, पनवेल, उरण आणि कर्जत या क्षेत्रातील गावांचा यामध्ये समावेश राहणार आहे.
वाढत्या लोकसंख्येला उत्तम हाऊसिंग, ट्रान्सपोर्टेशन आणि इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध व्हावे यासाठी हे नवीन शहर विकसित होणार आहे. हे शहर मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून डेव्हलप केले जाणार आहे. या नवीन शहरांमध्ये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स प्रमाणे बिजनेस हब देखील राहणार आहे.
याशिवाय सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी, मुंबई रेल विकास निगम 812 कोटी रुपये खर्चून नवीन पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर देखील बांधणार आहे. विशेष म्हणजे हे नव्याने विकसित होणारे शहर मुंबईची जीडीपी वाढवणार आहे. सध्या मुंबईची जीडीपी 150 अरब डॉलर आहे मात्र हे नवीन शहर विकसित झाल्यानंतर ही जी डी पी 250 अरब डॉलर पर्यंत पोहोचणार आहे.