This Mobile Number Will Close : सध्याचे हे युग कम्प्युटरचे युग, मोबाईलचे युग म्हणून ओळखले जात आहे. गेल्या दीड-दोन दशकांच्या काळात इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी क्षेत्रात मोठी प्रगती झाली असून या प्रगतीचा सर्वसामान्य मानवाला देखील मोठा फायदा झाला आहे. इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात नवनवीन संशोधन झाले आहे.

या नवनवीन संशोधनाचा आणि तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांना मोठा फायदा होत आहे. या माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील असेच एक नवखे आणि बहुउपयोगी संशोधन म्हणजे मोबाईल. आधी मोबाईलचा वापर हा फक्त फोन करण्यासाठी आणि एसएमएस करण्यासाठी होत होता.

Advertisement

आता मात्र मोबाईल आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि मोठा घटक आहे. कॉल, मेसेज या पलीकडेही मोबाईलचा वापर होऊ लागला आहे. पैसे काढण्यापासून ते पैसे टाकण्यापर्यंत मोबाईलचा वापर वाढला आहे.

पण, या मोबाईलमुळे अलीकडे मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या देखील घटना होत आहेत ही गोष्ट नाकारून चालणार नाही. दरम्यान, या साऱ्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे.

Advertisement

या निर्णयामुळे देशभरातील लाखो मोबाईल क्रमांक बंद होणार आहेत. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने देशभरातील सहा लाखाहून अधिक मोबाईल क्रमांकाचे रिव्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दूरसंचार विभागाने सध्या AI अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीनं जवळपास 6 लाख 80 हजार मोबाईल कनेक्शन चुकीच्या पद्धतीनं वापरात असल्याची शक्यता वर्तवली असून यामुळे फसवणुकीची घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Advertisement

हे मोबाईल नंबर चुकीची माहिती किंवा कागदपत्र सादर करून घेतले गेले असावे अशी शक्यता विभागाने वर्तवली असून याच पार्श्वभूमीवर या मोबाईल क्रमांकाचे रि-व्हेरिफिकेशन करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

संबंधित कंपन्यांना आता 60 दिवसांच्या आत या संबंधित मोबाईल क्रमांकाचे रि-वेरिफिकेशन करावे लागणार आहे. जर समजा या संबंधित मोबाईल क्रमांकाचे री व्हेरिफिकेशन पूर्ण झाले नाही तर हे मोबाईल क्रमांक बंद होतील अशी माहिती समोर येत आहे.

Advertisement

खरे तर, केंद्र शासनाच्या दूरसंचार विभागाकडून अशी कारवाई पहिल्यांदाच होत आहे असे नाही तर याआधी देखील विभागाने अशी कारवाई केली होती.

या कारवाईनंतर हजारो मोबाईल क्रमांक बंद करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा दूरसंचार विभागाकडून तशीच कारवाई हाती घेण्यात आली आहे. 

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *