Maharashtra Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या आपल्या राज्यासह देशात खूपच उल्लेखनीय आहे. दरम्यान, रेल्वेने प्रवास करणाऱ्या राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ही बातमी कोकण रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे.
खरे तर, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. शिवाय या चालू महिन्यात गुढीपाडव्याचा मोठा सण देखील येणार आहे. 9 एप्रिलला गुढीपाडव्याचा सण आहे. अशा परिस्थितीत सध्या विविध रेल्वे मार्गांवरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.
उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात की अनेकजण बाहेर पिकनिक साठी जातात. या दिवसांमध्ये पर्यटकांचे पाय आपसूक पर्यटन स्थळांकडे वळतात. आपल्या परिवारासमवेत अनेकजण सुट्ट्या स्पेंड करण्यासाठी पर्यटन स्थळांवर गर्दी करतात.
उन्हाळ्यात पिकनिकला जाणाऱ्यांची संख्या नेहमीच अधिक असते. यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. यावर्षी देखील अशीच परिस्थिती कायम राहणार असा अंदाज आहे.
दरम्यान, ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. ती म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर आता एक विशेष गाडी धावणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उधना ते मंगळुरू जंक्शन दरम्यान विशेष द्वीसाप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून दोनदा धावणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला आहे.
अशा परिस्थितीत आज आपण याविषयी गाडीचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेणार आहोत तसेच या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे याविषयी देखील माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार वेळापत्रक
उधना जंक्शन-मंगळुरु जंक्शन यां दरम्यान 7 एप्रिल ते 5 जून या कालावधीत विशेष गाडी चालवण्याचा निर्णय झाला आहे. ही ट्रेन या कालावधीत प्रत्येक बुधवारी आणि रविवारी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. ही ट्रेन उधना जंक्शन येथून रात्री 8 वाजता सुटणार आहे अन दुसऱ्या दिवशी सांयकाळी 7 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही विशेष गाडी 8 एप्रिल ते 6 जून यादरम्यान प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी चालवली जाणार आहे. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अतिरिक्त गर्दी नियंत्रणात राहणार असा विश्वास प्रशासनाला आहे.
कुठं थांबा मिळणार ?
या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा दिला जाणार आहे. ही ट्रेन वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव या महत्वाच्या स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे.