Union Bank Of India : तुम्हीही एफडी करण्याच्या तयारीत आहात का ? मग आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला एफडी मधून चांगले रिटर्न हवे असतील तर तुमच्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया चा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

युनियन बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सात दिवसांपासून ते दहा वर्षे पर्यंतची FD ऑफर करत आहे. ग्राहक त्यांच्या गरजेनुसार FD करू शकतात. दरम्यान आज आपण युनियन बँक ऑफ इंडिया ऑफर करत असलेल्या तीन वर्षाच्या एफ डी योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

खरे तर युनियन बँक ऑफ इंडिया की देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बॅंक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगले व्याज देत आहे. अशा परिस्थितीत, जर तुमचाही सुरक्षित गुंतवणुकीचा प्लॅन असेल आणि तुम्ही एफडी करण्याच्या तयारीत संपत युनियन बँक ऑफ इंडिया तुमच्यासाठी फायद्याचा सौदा सिद्ध होऊ शकतो. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया युनियन बँकेच्या या एफ डी योजनेची सविस्तर माहिती.

किती व्याजदर मिळतोय
युनियन बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत संकेतस्थळावरून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार युनियन बँक तीन वर्षाच्या एफडी साठी आपल्या ग्राहकांना कमाल सात टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे. यात सामान्य ग्राहकांना 6.50% आणि जेष्ठ नागरिकांना सात टक्के एवढे व्याजदर मिळत आहे.

Advertisement

म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी या एफ डी योजनेत गुंतवणूक केली तर त्यांना अधिकचा परतावा मिळू शकणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अधिकचे व्याजदर लागू होते. आता आपण जर या एफडी योजनेत तीन लाख रुपये गुंतवलेत तर किती रिटर्न मिळणार हे थोडक्यात समजून घेणार आहोत.

3 लाखांची गुंतवणूक किती रिटर्न देणार
जर समजा एखाद्या सामान्य ग्राहकाने या एफ डी योजनेत तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच तीन वर्षांनी तीन लाख 64 हजार 22 रुपये मिळणार आहे. यामध्ये ६४०२२ रुपये एवढे व्याज राहणार आहे.

Advertisement

जर गुंतवणूकदार ज्येष्ठ नागरिक असेल तर त्याला 7% व्याजदराने रिटर्न मिळणार आहेत. म्हणजेच ज्येष्ठ नागरिकांनी या एफबी योजनेत तीन लाख रुपयांची गुंतवणूक केली तर त्यांना तीन लाख 69 हजार 432 रुपये मिळणार आहे. तीन वर्षांच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांना 69 हजार 432 रुपये व्याज स्वरूपात मिळणार आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *