Union Budget 2024-25 : नुकताच केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर केला आहे. हा बजेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. खरे तर, या अंतरिम बजेट नंतर लगेचच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यामुळे या बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते.
या बजेटमध्ये काही महत्त्वाच्या घोषणा होणार अशा आशा सर्वांनाच होत्या. दरम्यान या बजेटमध्ये टॅक्स स्लॅब मध्ये चेंजेस होतील अशी आशा करदात्यांना होती.
मात्र निर्मला सीतारामन यांनी सहाव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये टॅक्स स्लॅब मध्ये कोणताच बदल केला जाणार नाही अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली आहे.
यामुळे करदात्यांची निराशा झाली आहे. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले असल्याचे म्हटले आहे.
ते म्हटले की, ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता हातात घेतले अर्थातच 2014 मध्ये जेव्हा मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा सरकार पुढे वेगवेगळे आव्हाने होती.
यामुळे शासनाने अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक कार्यक्रम व योजना राबवल्या आहेत. याचा परिणाम म्हणून आता देशापुढील अनेक आव्हाने संपुष्टात आली आहेत. आता देश वेगाने विकसित होण्याच्या मार्गावर आहे.
तसेच 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल अशी आशा देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांनी सरकारचे लक्ष सर्व समावेशक विकासावर असल्याचे म्हटले आहे.
निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणादरम्यान सांगितले की, देशाची वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. तसेच त्यांनी आयकर संकलना विषयी माहिती दिली.
अर्थमंत्री महोदया यांनी 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी टॅक्स स्लॅब मध्ये कोणताच बदल केला जाणार नाही अशी घोषणा केली आहे.
म्हणजे सात लाख रुपये उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही. याशिवाय त्यांनी 2025-26 पर्यंत वित्तीय तूट आणखी कमी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.