Vande Bharat Express : भारतात प्रवासासाठी रेल्वेचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रेल्वेचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा असल्याने या प्रवासाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रेल्वे प्रवासाचा प्रवास जलद आणि सुरक्षित व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे.
याच पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ही संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेन सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वंदे भारत एक्सप्रेस या हायस्पीड ट्रेनच्या विशेष चर्चा सुद्धा पाहायला मिळतं आहेत.
ही गाडी सर्वप्रथम 2019 मध्ये सुरु झाली. सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावरील सुरू करण्यात आली. यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू करण्यात आली आहे.
2019 पासून आतापर्यंत देशातील 41 महत्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु झाली आहे. यापैकी 6 गाड्या आपल्या राज्यात धावत आहेत.
राज्यातील मुंबई ते गांधीनगर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते जालना, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही ट्रेन सुरु आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. राज्यातील विविध मार्गांवर या गाडीला चालवले पाहिजे यासाठी मागणी केली जात आहे.
पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते शेगाव, पुणे ते वडोदरा, मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते शेगाव या मार्गावर ही गाडी सुरू करणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस ते कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस यादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याबाबत मोठी हालचाल पाहायला मिळतं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही गाडी पुढील महिन्यात म्हणजे मार्च 2024 मध्ये सुरु होणार आहे.
याबाबत रेल्वे बोर्डाकडून कोणतीचं अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र मीडिया रिपोर्टमध्ये असा दावा होत आहे. यामुळे ही गाडी पुढील महिन्यात सुरु होणार कां हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.