Vande Bharat Express : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेसबाबत. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत तयार झालेली पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही गाडी सर्वप्रथम नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली होती.
त्यानंतर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला गेला आहे. सध्या देशात 41 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी अर्थातच 30 डिसेंबर 2023 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यामध्ये मुंबई ते जालना या मार्गावरील गाडीचा देखील समावेश होता. राज्यात आतापर्यंत सात वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या आहेत.
मुंबईतील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, नागपूर ते बिलासपूर, इंदोर ते नागपूर या सात मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे.
अशातच आता महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. 2024 मध्ये सांस्कृतिक राजधानी पुण्याला या गाडीची भेट मिळणार आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून ही नवीन गाडी चालवली जाणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे कडून पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू केली जाणार आहे.
सध्या स्थितीला मुंबई ते सोलापूर दरम्यान चालवली जाणारी गाडी पुणे मार्गे सुरू आहे. परंतु थेट पुण्यावरून एकही वंदे भारत ट्रेन सुरू झालेली नाही.
मात्र आता पुणे ते सिकंदराबाद दरम्यान चालवली जाणारी ही गाडी थेट पुणे रेल्वे स्थानकावरून चालवली जाणार आहे. खरंतर सध्या पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे.
मात्र आता या शताब्दी एक्सप्रेसला विराम दिला जाण्याची शक्यता आहे आणि या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस ही हाय स्पीड ट्रेन चालवण्याची दक्षिण मध्य रेल्वेची योजना आहे.
तथापि ही गाडी केव्हा सुरू होणार याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या गाडीची लवकरच घोषणा होणार आहे.