Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील आठ गाड्या आपल्या महाराष्ट्राला मिळाल्या आहेत.
राज्यातील सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते साईनगर शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सी एस एम टी ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर आणि नागपूर ते इंदूर या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
विशेष म्हणजे या गाड्यांना प्रवाशांच्या माध्यमातून भरभरून असा प्रतिसाद दाखवला जात आहे. या हाय स्पीड ट्रेनमुळे रेल्वेच्या महसूलमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच यामुळे प्रवाशांचा प्रवास हा आधीच्या तुलनेत अधिक आरामदायी आणि जलद झाला आहे.
हेच कारण आहे की तिकीट दर अधिक असतानाही या गाडीला प्रवाशांकडून अधिकची पसंती मिळत आहे. अशातच आता देशाला पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
एकात्मिक कोच फॅक्टरी (ICF) येथे लवकरच पाच वंदे भारत ट्रेन तयार होणार आहेत. या ट्रेन तयार झाल्यानंतर या गाड्या देशातील विविध मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. या गाड्या कुठे चालवायच्या याबाबतचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे.
रेल्वे बोर्ड लवकरच त्यांचे गंतव्यस्थान ठरवणार आहे. केशरी रंगाच्या या गाड्यांची अंतिम तपासणी सध्या सुरू आहे. या प्रत्येक ट्रेनमध्ये 16 डबे राहणार आहेत. आयसीएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वंदे भारत गाड्या कोणत्या मार्गावर धावतील याचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल.
महाराष्ट्रालाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेस
दुसरीकडे मीडिया रिपोर्ट मध्ये राज्यातील मुंबई ते कोल्हापूर, पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते असा दावा केला जात आहे. यामुळे या कोचं फॅक्टरीमध्ये तयार होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस या मार्गावर चालवल्या जाऊ शकतात असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे.
तथापि, या वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या मार्गावर चालवायच्या या संदर्भातील निर्णय हा रेल्वे बोर्ड घेणार आहे. यामुळे या गाड्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार हे जाणून घेण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे.