Vande Bharat Express : सध्या राज्यासह संपूर्ण देशात वंदे भारत एक्सप्रेस या हायस्पीड ट्रेनची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही हाय स्पीड ट्रेन देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत देशातील 34 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.
सध्या महाराष्ट्रात सहा मार्गांवर ही गाडी सुरू असून राज्याला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर 2023 ला मुंबई-जालना वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण केले जाणार आहे.
तत्पूर्वी या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसची ट्रायल रन होणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर या रेल्वे मार्गावर काल अर्थातच 27 डिसेंबर 2023 रोजी ट्रायल रन घेण्यात आली आहे.
विशेष म्हणजे ही ट्रायल रन यशस्वी झाली असून आता या मार्गावर प्रत्यक्षात वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. या हायस्पीड ट्रेनची ट्रायल रन पूर्ण झाली असल्याने आता या मार्गावर ही गाडी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर सहित संपूर्ण मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
जालना, छत्रपती संभाजी नगर येथून मुंबईला येणाऱ्या नागरिकांसाठी ही ट्रेन विशेष फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही गाडी जालना येथून सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार आहे आणि दुपारी अकरा वाजून 55 मिनिटांनी ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
तसेच मुंबई येथून ही गाडी दुपारी एक वाजून दहा वाजता रवाना होणार आहे आणि जालना येथे रात्री साडेआठ वाजता ही गाडी पोहोचणार आहे.
झालेल्या माहितीनुसार ही गाडी छत्रपती संभाजी नगर, अंकाई, मनमाड, नाशिक, ठाणे या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.