Vande Bharat Express : सध्या देशात वंदे भारत एक्सप्रेस बाबत मोठ्या चर्चा पाहायला मिळत आहेत. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी कमी वेळेतच रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय बनली आहे. या गाडीचा स्पीड हा ईतर एक्सप्रेस गाड्यांपेक्षा अधिक असल्याने या गाडीमुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे.
हेच कारण आहे की, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशभरातील महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला चालवले जात आहे. आतापर्यंत देशातील एकूण 25 महत्त्वाच्या मार्गावर या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील पाच महत्त्वाचा मार्गावर ही गाडी सुरु आहे.
राज्यातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर आणि नागपूर ते बिलासपुर या पाच महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी सुरू आहे. विशेष बाब अशी की मुंबई ते कोल्हापूर दरम्यान देखील या गाडीसाठी मागणी जोर धरत आहे.
रेल्वेमंत्र्यांनी कोल्हापूर ते मुंबई दरम्यान ही गाडी चालवण्यासाठी मंजुरी दिल्याचे देखील वृत्त समोर आले आहे. यामुळे आगामी काही दिवसात यादेखील मार्गावर ही गाडी सुरू होऊ शकते. अशातच वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे.
ती म्हणजे देशातील एका महत्त्वाच्या मार्गावर ही गाडी लवकरच सुरू केली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेंगलोर ते हैदराबाद दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. या दोन्ही शहरा दरम्यान 610 किलोमीटरचे अंतर असून त्यानंतर या गाडीने ट्रायल रन मध्ये मात्र साडेसात तासात पूर्ण करून दाखवले आहे.
या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा ट्रायल रन यशस्वी झाला असून आता 24 सप्टेंबरला म्हणजेच उद्या या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या गाडीला उद्या हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. विशेष असे की, ट्रायल रन दरम्यान ही गाडी या मार्गावरील काही महत्त्वाच्या भागात तब्बल 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावली आहे.
कसं असेल वेळापत्रक
ही गाडी हैदराबाद येथील काचीगुडा येथून सकाळी साडेपाच वाजता सुटेल आणि बेंगलोर येथील यशवंतपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी दुपारी दोन वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासासाठी यशवंतपूर रेल्वे स्थानकावरून ही गाडी दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि रात्री सव्वा अकरा वाजता हैदराबाद येथील काचीगुडा येथे पोहोचेल.
प्रवासासाठी लागतील साडेआठ तास !
ट्रायल रन दरम्यान या गाडीने अवघ्या साडेसात तासात हा प्रवास पूर्ण करून दाखवला आहे. मात्र ज्यावेळी ही गाडी सुरू होईल त्यावेळी या प्रवासासाठी गाडीला साडेआठ तासांचा कालावधी लागू शकतो.
सध्या स्थितीला या मार्गावर ज्या एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत त्यांना प्रवासासाठी 12 तास लागतात. मात्र वंदे भारत एक्सप्रेस ने हा प्रवास फक्त साडेआठ तासात होणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास गतिमान होईल यात शंकाच नाही.