Vande Bharat Express : गेल्या काही वर्षांपासून वंदे भारत एक्सप्रेस या संपूर्ण भारतीय बनावटीची हाय स्पीड ट्रेनची विशेष चर्चा पाहायला मिळत आहे. 2019 मध्ये सुरू झालेली ही गाडी अल्पावधीतच रेल्वे प्रवाशांच्या मनात घर करून गेली आहे.
गाडीची लोकप्रियता पाहता भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जात आहे. सध्या या प्रकारातील 7 ट्रेन्स महाराष्ट्रातून धावत आहे.
नुकत्याच दोन दिवसांपूर्वी अर्थातच 30 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्राला आणखी एक नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
मराठवाड्यातील जालना ते देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबई या दरम्यान ही गाडी सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे.
मोदींनी 30 डिसेंबरला सहा वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला आहे. यात मुंबई-जालना या गाडीचा देखील समावेश होता. यामुळे आता भारतातील एकूण वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 41 एवढी झाली आहे.
विशेष म्हणजे येत्या काही महिन्यात आणखी काही महत्त्वाच्या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे. महाराष्ट्राला देखील आणखी Vande Bharat Train दिल्या जाणार आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, राजधानी मुंबई ते मराठवाड्यातील लातूर या शहरा दरम्यान ही गाडी सुरू होणार आहे. 2024 मध्ये या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचे नियोजन आहे.
सध्या राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गावर ही गाडी सुरू आहे.
म्हणजेच मुंबईला आतापर्यंत पाच वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे. दरम्यान चालू वर्षात मुंबई ते लातूर या मार्गावर ही गाडी सुरू झाल्यानंतर ही संख्या सहा वर जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या मार्गावर जनरल मॅनेजर स्पीड ट्रायल घेणार आहेत.
यानंतर मग वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींचा विचार केला जाईल आणि त्यानंतर या मार्गावर ही हाय स्पीड ट्रेन सुरू करायची की नाही याबाबत निर्णय होणार असल्याचे सूत्रांच्या माध्यमातून सांगितले जात आहे.