Vande Bharat Sleeper Express Railway News : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन सर्वप्रथम 2019 मध्ये सुरू झाली होती. पहिल्यांदा ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर सुरू झाली. यानंतर टप्प्याटप्प्याने या गाडीचे देशातील विविध मार्गांवर संचालन सुरू झाले आहे.
आतापर्यंत ही गाडी देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू झाली असून लोकसभा निवडणुकीनंतर अजूनही देशातील काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू होणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार ही गाडी मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर चालवली जाणार आहे.
सध्या ही गाडी महाराष्ट्रातील 8 मार्गांवर सुरू आहे. विशेष म्हणजे या सर्व वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशातच, आता वंदे भारत एक्सप्रेसचे स्लीपर वर्जन देखील लाँच केले जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे.
विशेष म्हणजे भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुणे ते सिकंदराबाद या मार्गावर सुरू होणार असा दावा केला जात आहे. यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही गाडी सुरू झाल्यास पुणेकरांचा रेल्वे प्रवास आणखी सोयीचा होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते सिकंदराबाद दरम्यान सध्या शताब्दी एक्सप्रेस सुरू आहे. मात्र रेल्वे ही गाडी थांबवून त्या ऐवजी वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवू शकते असा दावा केला जात आहे.
सध्या सुरू असलेल्या शताब्दी एक्सप्रेसला पुणे ते सिकंदराबाद दरम्यानचा प्रवास करण्यासाठी जवळपास साडेआठ तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय. मात्र जेव्हा वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी एक तासांनी कमी होण्याची शक्यता आहे.
तथापि या मार्गावर सुरू होणाऱ्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचे वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या ठिकाणी थांबणार म्हणजेच स्टॉप अजून ठरवले गेलेले नाहीत. परंतु लवकरच याचे वेळापत्रक आणि थांबे जाहीर होण्याची शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आली आहे.