Vande Bharat Sleeper Train : वंदे भारत एक्सप्रेसच्या अभूतपूर्व यशानंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार आहे. म्हणजेच आता प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेस मधून झोपून प्रवास करता येणार आहे. खरंतर सध्या देशात 51 वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहेत. विशेष म्हणजे आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आहे.
नजीकच्या भविष्यात आपल्या महाराष्ट्राला देखील नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. कोल्हापुर येथे आयोजित एका प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नजीकच्या भविष्यात कोल्हापूरला नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार अशी घोषणा केली आहे.
यामुळे मुंबई ते कोल्हापूर दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊ शकते अशी आशा व्यक्त होत आहे. दुसरीकडे भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान याच ट्रेन संदर्भात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेनची चाचणी पुढल्या महिन्यापासून अर्थातच मे महिन्यापासून सुरू होणार आहे.
म्हणजे वंदे भारत स्लीपर ट्रेन लवकरच रुळावर धावणार आहे. ही गाडी लांब पल्ल्याच्या मार्गावर चालवली जाणार आहे. तसेच ही गाडी नाईटला देखील धावणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी आरामदायी होईल अशी आशा आहे.
याशिवाय भारतीय रेल्वे कमी अंतरासाठी वंदे भारत मेट्रो सुरू करणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, वंदे भारत मेट्रोची चाचणी जुलै महिन्यापासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे. वंदे मेट्रो 124 हून अधिक शहरांमध्ये चालवली जाणार आहे.
विशेष बाब अशी की त्यापैकी काही मार्ग अंतिम झाले आहेत. वंदे मेट्रो लखनौ-कानपूर, आग्रा-मथुरा, दिल्ली-रेवाडी, भुवनेश्वर-बालासोर आणि तिरुपती-चेन्नई दरम्यान चालवली जाणार अशी योजना बनवण्यात आली आहे.
म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता भारतात वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे मेट्रो या गाड्या देखील लवकरच पाहायला मिळणार आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात रेल्वे प्रवाशांचा प्रवास आणखी जलद आणि सुरक्षित होणार आहे.