Vande Bharat Train : वंदे भारत ट्रेन बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 12 मार्च रोजी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
खरंतर ही ट्रेन सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाचा मार्गांवर सुरू आहे. यातील सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत.
राज्यातील मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्ड, मुंबई ते गोवा , मुंबई ते जालना, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपुर आणि इंदूर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे यशस्वीरित्या संचालन सुरू आहे.
विशेष बाब अशी की महाराष्ट्राला आणखी काही वंदे भारत एक्सप्रेस ची भेट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावर मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवण्याचे नियोजन आहे.
या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेस लवकरच सुरू होतील अशी आशा यावेळी व्यक्त होत आहे. असे झाले तर राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या 9 वर जाणार आहे.
आता आपण येत्या 12 मार्चला कोणत्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस
पटना ते लखनऊ, देहरादून ते लखनऊ आणि रांची ते वाराणसी या तीन मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेस ला 12 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. उल्लेखनीय आहे की सध्या यूपीमध्ये पाच वंदे भारत ट्रेन धावत आहेत.
या वंदे भारत ट्रेन लखनौ-वाराणसी, गोरखपूर-लखनौ, अयोध्या धाम-आनंद विहार आणि आनंद विहार ते पश्चिम उत्तर प्रदेश मार्गे डेहराडूनपर्यंत धावत आहेत.