Vande Bharat Train : वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांमध्ये लोकप्रिय झाली आहे. या ट्रेनचा प्रवास अनेकांना आवडू लागला आहे.
सध्या स्थितीला देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राला देखील सात गाड्या मिळालेल्या आहेत. अशातच राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
कारण की आता राज्याला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. यामध्ये राज्यातील खानदेश विभागाला देखील नवीन वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 7 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू होणार आहे. यामुळे आता राज्यातील वंदे भारत एक्सप्रेस ची संख्या 14 वर पोहचणार आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून राज्यातील मुंबई ते अहमदाबाद, मुंबई ते शेगाव, पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते बडोदा, पुणे ते सिंकदराबाद, मुंबई ते कोल्हापूर या मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवली जाणार आहे.
विशेष म्हणजे या सात पैकी दोन गाड्या खानदेश विभागातून धावणार आहे. यामुळे खानदेशमधील रेल्वे प्रवाशांना देखील आता वंदे भारत एक्सप्रेसने जलद प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन गाड्या खानदेश मधील भुसावळ रेल्वे स्थानकावरून धावणार आहे.
त्यामुळे भुसावळ मधील जनतेला आता जलद गतीने शेगावकडील आणि मुंबईकडील तसेच पुण्याकडील प्रवास करता येणार आहे. भुसावळसहित खानदेश विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी ही बातमी निश्चितच आनंदाची राहणार आहे.
सध्या राज्यातून ज्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे त्यांना प्रवाशांच्या माध्यमातून अभूतपूर्व प्रतिसाद दाखवला जात आहे. यामुळे नव्याने सुरू होणाऱ्या या गाड्यांना देखील चांगला अभूतपूर्व प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.