Voter Id Card Aadhar Link : सरकारने आधारसोबत पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन अतिशय आवश्यक कागदपत्रे आहेत. ही दोन्ही कागदपत्रे आता परस्परांना संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या लोकांनी आधार सोबत पॅन कार्ड लिंक केलेले नाही आता त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात आलेले आहे. तसेच आता ज्या लोकांचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले आहे त्यांना आधार सोबत पॅन कार्ड लिंक करण्यासाठी पेनल्टी देखील द्यावी लागत आहे.
सोबतच मतदान कार्ड आधार सोबत लिंक करण्याची देखील प्रोसेस सुरू करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांकडून आता मतदान कार्ड आधार सोबत लिंक करणे सुद्धा अनिवार्य करण्यात आले आहे का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान सर्वसामान्यांच्या या प्रश्नाचे उत्तर आता सरकारने दिले आहे.
केंद्र शासनाच्या माध्यमातून वोटर आयडी कार्ड आधार सोबत लिंक करणे अनिवार्य आहे की नाही याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनामध्ये कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी याबाबत महत्त्वाचे अपडेट दिली आहे.
काय म्हटले कायदामंत्री
लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सभागृहाला वोटर आयडी कार्ड आधार सोबत लिंक करणे अनिवार्य आहे की नाही याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेला सांगितले की, वोटर आयडीसोबत आधार लिंक करण्याला आतापर्यंत सुरुवात झालेली नाही.
पण, सध्या आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे आणि लोकांना आधार पॅन सोबत लिंक करण्यासाठी आवाहन देखील केले जात आहे.
मात्र सध्या स्थितीला भारतात मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचं कोणतंही लक्ष्य अद्याप देण्यात आलेलं नाही. म्हणजेच मतदान कार्ड आधार सोबत लिंक करणे अजून अनिवार्य झालेले नाही.
पण देशातील नागरिक त्यांच्या इच्छेने मतदान कार्ड आधार सोबत लिंक करू शकणार आहेत. दरम्यान मतदान कार्ड आधारसोबत लिंक करण्यासाठी फॉर्म 6B भरावा लागत आहे.
हा फॉर्म निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर सबमिट करावा लागतो. अशातच हा फॉर्म 6B भरण्यासाठी मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.