Voter ID Card Address Change : पुढल्या महिन्यात अर्थातच एप्रिल महिन्यात लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू होणार आहे. 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाच्या प्रक्रियेचा श्री गणेशा होणार असून या दिवशी लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडले जाणार आहे. खऱ्या अर्थाने आता देशात लोकशाहीचा महा कुंभ सजला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.

राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करत आहेत. अनेक ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी आता वाढल्या आहेत. मतदार राजांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नेते मंडळी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण मतदारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन जर चालू आहोत. खरेतर मतदान करण्यासाठी मतदान कार्डची गरज असते. मतदार यादीत नाव असल्यास मतदान करता येते. मात्र अनेक मतदान कार्ड धारकांचा मतदान कार्ड वरील पत्ता कसा बदलायचा हा प्रश्न होता.

दरम्यान, आज आपण मतदान कार्डवरील पत्ता घरबसल्या कशा तऱ्हेने चेंज केला जाऊ शकतो याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरे तर मतदान कार्ड वरील पत्ता बदलवण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन असे दोन्ही पर्याय मतदानकार्ड धारकांकडे उपलब्ध असतात.

Advertisement

जर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मतदान कार्ड वरील पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला यासाठी तुमच्या जवळील निवडणूक आयोगाच्या ऑफिसला भेट द्यावी लागेल. दुसरीकडे तुम्ही मोबाईलद्वारे ऑनलाईन सुद्धा मतदान कार्ड वरील पत्ता चेंज करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://eci.gov.in या निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागणार आहे.

इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे Elector म्हणजे इलेक्टर या ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या विविध ऑप्शन पैकी चार नंबरच्या ऑप्शन वर म्हणजेच update your details in electoral roll या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

Advertisement

या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मतदाता सेवा पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. यानंतर मग तुम्हाला तिथे फॉर्म क्रमांक आठ भरावा लागणार आहे. यासाठी Form 8 (Shifting of residence/correction of entries in existing electoral roll/replacement of EPIC/marking of PwD) वर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्हाला correction of entries in existing electoral roll या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे. यानंतर मग तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी किंवा एपिक नंबर आणि पासवर्ड टाकून कॅपचा कोड भरायचा आहे.

Advertisement

मग रिक्वेस्ट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला आधार नंबर, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे.त्यानंतर मग नवीन ऍड्रेस म्हणजे तुम्हाला तुमचा जो नवीन पत्ता ॲड करायचा आहे तो प्रविष्ट करायचा तो इंटर करायचा आहे आणि आवश्यक ते कागदपत्र देखील अपलोड करायचे आहे.

यानंतर डिक्लेरेशन म्हणजेच स्वयंघोषणापत्र भरायचे आहे. यानंतर त्याखालील कॅपचा कोड भरायचा आहे. एवढे केले की तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे. आता तुमचा पत्ता पडताळणी नंतर मतदान कार्डवर अपडेट केला जाईल आणि नवीन मतदान कार्ड तुम्हाला तुमच्या नवीन पत्त्यावर पाठवले जाईल.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *