Voter ID Card : भारतात गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या वर्षाच्या अखेरीस देशातील 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आयोजित केल्या जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर या संबंधित राज्यांमध्ये सध्या प्रचाराची लगबग पाहायला मिळत आहे. विविध पक्षांच्या माध्यमातून यासाठी मोर्चे बांधणी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे पुढील वर्षी लोकसभेच्या देखील निवडणुका रंगणार आहेत.
या पार्श्वभूमीवर सरकारकडून आत्तापासूनच सर्वसामान्यांना खुश करण्यासाठी विविध निर्णय घेतले जात आहेत. दरम्यान निवडणुका जवळ आल्या असल्याने नवीन मतदारांना मतदान कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे लागणार आहे.
खरंतर पूर्वी मतदान कार्ड काढणे खूपच क्लिष्ट काम होते. पूर्वी मतदान कार्ड काढण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असत. शिवाय मतदान कार्ड लवकर नागरिकांना मिळतही नसे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत.
आता मात्र मतदान कार्ड काढण्याची प्रोसेस खूपच सोपी झाली आहे. आता नवीन मतदारांना मतदान कार्ड नोंदणीसाठी कोणत्याच शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासत नाही. मतदार आता घरबसल्या नवीन मतदान कार्ड साठी अर्ज करू शकणार आहेत.
आता नागरिकांना स्वतःच्या स्मार्टफोनवरून मतदान कार्ड साठी अर्ज करता येत आहे. त्यामुळे जर तुम्हीही नवीन मतदान कार्ड काढण्याच्या तयारीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून मतदान कार्डसाठी कसा अर्ज करायचा याविषयी महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
कसं काढणार वोटिंग कार्ड
आता नवीन मतदान कार्ड बनवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येत आहे. भारतीय निवडणूक आयोगाने देशातील नागरिकांसाठी ही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
जर तुमचेही मतदान कार्ड तयार नसेल आणि तुमचे वय 18 वर्षे किंवा अठरा वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन मतदान कार्ड साठी अर्ज करू शकणार आहात.
यासाठी तुम्हाला voterportal.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन अर्थातच नोंदणी करावी लागणार आहे. रजिस्ट्रेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला लॉगिन करावे लागेल.
लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Form 6 भरावा लागणार आहे. हा फॉर्म भरल्यानंतर आणि तिथे विचारलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचे आहे. हा अर्ज सबमिट झाल्यानंतर तुमचे मतदान कार्ड बनवले जाईल आणि मतदान कार्ड तुमच्या पत्त्यावर पोहच केले जाईल.