Voter ID Card : येत्या काही दिवसात लोकसभेच्या निवडणुका सुरू होणार आहेत. लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. खरे तर आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुका झाल्यात की लगेच विधानसभेच्या निवडणुका रंगणार आहेत.
यामुळे महाराष्ट्रात सध्या विविध राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे.
राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांच्या माध्यमातून जागा वाटपासाठी मंथन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एकंदरीत आगामी निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
दरम्यान आज आपण मतदान कार्ड बाबतच्या एका महत्त्वाच्या बाबी विषयी माहिती जाणून घेणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडे दोन मतदान कार्ड असू शकतात का किंवा दोन वोटर आयडी कार्ड असणे भारतात गुन्हा आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जात होते.
अशा परिस्थितीत आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
भारतात 2 वोटर आयडी कार्ड गुन्हा आहे का ?
व्यक्तीचे वय १८ वर्षे पूर्ण होताच भारतात मतदार ओळखपत्र बनवले जाते. मतदान कार्डचा वापर हा प्रामुख्याने मत देण्यासाठी होतो. तुम्हीही कधी ना कधी मतदान केलेच असेल.
मात्र भारतात असेही काही लोक आहेत ज्यांच्याकडे दोन ठिकाणचे दोन मतदान कार्ड आहेत. मात्र असे दोन मतदान कार्ड बाळगणे आणि एका व्यक्तीने दोन ठिकाणी मतदान करणे हा भारतात गुन्हा मानला जातो.
एखादा व्यक्ती जर वेगवेगळ्या दोन मतदान कार्डाचा वापर करून दोन ठिकाणी मतदान करत असेल तर भारतीय कायद्याने अशा कृत्याला गुन्हा समजला गेला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने दोन मतदान कार्डचा वापर करून दोन ठिकाणी मतदान केले तर त्याला एक वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा देखील होऊ शकते. जर एखाद्या व्यक्तीकडे दोन मतदान कार्ड असतील तर तो फॉर्म सात हा अर्ज भरून एक मतदान कार्ड सरेंडर करू शकतो.
यासाठी फॉर्म 7 भरून इलेक्शन ऑफ इंडियाच्या कार्यालयात जमा करावा लागेल. तुम्ही हा फॉर्म बीएलओ, एसडीएम यांच्या कार्यालयातही जमा करू शकता.