Voter ID Card News : अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकीचा बिगुल आता खऱ्या अर्थाने वाजला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार संपूर्ण देशात एकूण सात टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात एकूण पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मतदान कार्डधारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण जर एखाद्या व्यक्तीचे मतदार यादीत नाव असेल मात्र त्याच्याकडे मतदान कार्ड नसेल किंवा जुने मतदान कार्ड असेल आणि त्याला नवीन कलरफुल मतदान कार्ड हवे असेल तर हे कलरफुल मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
आज आपण EPIC Voter Card म्हणजेच इलेक्ट्रॉल फोटो आयडी कार्ड कसे दोन मिनिटात डाऊनलोड केले जाऊ शकते हे पाहणार आहोत. खरे तर येत्या काही दिवसात मतदानाला सुरुवात होणार आहे. मतदान करण्यासाठी मतदान कार्डची गरज भासणार आहे.
EPIC Voter Card किंवा कलरफुल मतदान कार्ड कसे डाउनलोड करायचे
यासाठी तुम्हाला सर्वप्रथम भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदाता सेवा पोर्टल या आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागणार आहे. https://voters.eci.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला भेट द्यावी लागणार आहे.
वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला साइन अप करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव, मतदान कार्ड क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकावा लागणार आहे.
एकदा तुमचे साइन अप म्हणजेच नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की तुम्हाला पुन्हा एकदा लॉगिन घ्यावी लागणार आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या e-Epic Download या ऑप्शन मध्ये जावे लागणार आहे.
या ऑप्शन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला e-Epic क्रमांक/ फॉर्म संदर्भ क्र. दोनपैकी एक ऑप्शनवर क्लिक करावे लागणार आहे. मग तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या रकान्यात तुमचा e-Epic क्रमांक/ फॉर्म संदर्भ क्र. टाकावा लागणार आहे. मग पुढे राज्य निवडावे लागणार आहे.
एवढे सारे केल्यानंतर तुम्हाला शोध म्हणजे सर्च या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. आता तुमच्या मोबाईल नंबरवर किंवा मग ईमेल आयडीवर एक ओटीपी पाठवला जाणार आहे. तो ओटीपी दिलेल्या रकान्यात तुम्हाला टाकावा लागणार आहे. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन करावे लागेल.
व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ई-व्होटर कार्ड म्हणजे कलरफुल मतदान कार्ड दिसणार आहे. ते कलरफुल मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाऊनलोड या बटणावर क्लिक करावे लागणार आहे. तुम्ही डाउनलोड केलेले ई-ईपीआयसी मतदार कार्ड तुम्ही कुठेही वापरू शकतात हे विशेष.