Maharashtra Board 10th And 12th Result Date : मे महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. यामुळे आता दहावी आणि बारावीचा निकालाची विद्यार्थ्यांना आणि पालकांना आतुरता लागली आहे.
अशातच सोशल मीडियामध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. सोशल मीडियामध्ये आणि काही संकेतस्थळावर निकालाच्या चुकीच्या तारखा दिल्या जात आहेत.
सोशल मीडियामध्ये आधी दहा मे पर्यंत दहावीचा निकाल लागणार असे म्हटले गेले होते. तसेच काही ठिकाणी दहावी आणि बारावीचा निकाल 20 ते 30 मे दरम्यान जाहीर होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे.
यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये निकालासंदर्भात संभ्रमावस्था तयार झाली आहे. सोशल मीडियामध्ये आणि काही संकेतस्थळावर निकालाच्या वेगवेगळ्या तारखा समोर येऊ लागल्याने पालकांच्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून संबंधित शाळा तथा विभागीय मंडळाकडे दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात चौकशी होऊ लागली आहे.
दरम्यान विद्यार्थ्यांचे आणि पालकांच्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची दमछाक उडत असून यामुळे निकालाच्या प्रक्रियेवर परिणाम होत आहे. परिणामी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी सोशल मीडियामधील अशा अफवांवर विश्वास ठेवू नये आणि निकालाच्या अपडेट साठी राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी असे म्हटले आहे.
खरंतर गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आणि पालकांच्या माध्यमातून दहावीचे आणि बारावीचे रिझल्ट केव्हा डिक्लेअर होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, या संदर्भात सोशल मीडियामध्ये वेगवेगळे दावे होत असल्याने पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
यामुळे आता दहावी आणि बारावीच्या निकालात संदर्भात राज्य मंडळाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दहावी आणि बारावीच्या निकाला संदर्भात बोलताना राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेला निकालाबाबत मोठी अपडेट केली आहे.
त्यांनी बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा अखेरच्या आठवड्यात लावण्याचे मंडळाचे प्रयत्न आहेत. परंतु, त्याच्या कोणत्याही तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.
यामुळे निकालाबाबत सोशल मीडियावर आणि काही संकेतस्थळावर वायरल होत असलेल्या या अफवांवर विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.