Cotton Farming : कापूस हे महाराष्ट्रासहित देशातील विविध राज्यांमध्ये उत्पादित होणारे एक मुख्य नगदी पीक आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे आणि कापूस पिकातून त्यांना चांगली कमाई व्हावी यासाठी कृषी शास्त्रज्ञांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न देखील केले जात आहेत.
खरे तर अलीकडे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कापूस पिकावर थ्रिप्स आणि पांढऱ्या माशी सारख्या कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याने कापसाचे उत्पादन कमी होत चालले आहे. दरम्यान, सरकार आता ‘गॉसिपियम आर्बोरियम’ या देशी कापूस जातीच्या लागवडीला प्रोत्साहन देत आहे.
कारण Gossypium Arboreum वर कपाशीच्या पानांच्या कर्ल विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. हे कापूस पिक रस शोषक कीटक (पांढरी माशी, थ्रीप्स आणि जॅसिड्स) आणि रोग (बॅक्टेरियल ब्लाइट आणि अल्टरनेरिया रोग) यांना सहनशील राहणार आहे. परंतु या जातीला ग्रे मोल्ड रोग होण्याची शक्यता देखील असते. याशिवाय देशी कापसाची ही जात दुष्काळाला सहनशील असल्याचा दावा केला जातो.
याच देशातील विविध कापूस उत्पादक प्रदेश आणि राज्यांमध्ये व्यावसायिक लागवडीसाठी जारी करण्यात आलेल्या 77 जी आर्बोरियम कापूस वाणांतुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी PA 740, PA 810, PA 812 आणि PA 837 या चार लांब कापसाच्या जाती विकसित केल्या आहेत. या लॉन्स टेबल कापसाची लांबी तब्बल 28 ते 31 mm पर्यंतची असल्याचा दावा कुठे आहे.
म्हणजेच लॉंग स्टेपल कापसाच्या जातींमध्ये या कापूस जातींची लांबी सर्वाधिक आहे. शिवाय, या जाती पांढरी माशी, थ्रिप्स यांसारख्या रस शोषक किडींना देखील प्रतिरोधक आहेत. यामुळे या वाणाच्या लागवडीतून कापूस उत्पादकांना निश्चितच चांगले उत्पादन मिळणार आहे शिवाय या जाती उत्पादित करण्यासाठी खूपच कमी खर्च देखील त्यांना करावा लागत आहे. परिणामी कापूस उत्पादकांच्या उत्पन्नात वाढ होत आहे.