Central Government Scheme:- नागरिकांना अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आर्थिकदृष्ट्या मजबूत करता यावे याकरिता केंद्र सरकारच्या अनेक योजना असून सर्वसामान्य नागरिक ते शेतकरी आणि उद्योग व्यवसाय उभारणी करीता या योजनांचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. परंतु केंद्र किंवा राज्य सरकारच्या अशा अनेक योजना आहेत की त्यांची पुरेशी माहिती अजून देखील आपल्यापैकी बऱ्याच जणांना नसते.
ज्याप्रमाणे उद्योग व्यवसाय उभारणी किंवा शेतीसाठी विविध बाबींकरिता अनुदान देणाऱ्या योजना आहेतच परंतु विम्याच्या दृष्टिकोनातून पाहिले तर नागरिकांना कमीत कमी पैशांमध्ये विम्याचे कवच मिळावे याकरिता देखील केंद्र सरकारच्या योजना आहेत. त्यामुळे अशा योजनांची माहिती घेऊन योजनांचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे.
अशीच एक केंद्र सरकारची योजना आहे जी तुम्हाला वर्षाला बारा रुपये म्हणजेच महिन्याला एक रुपये भरून दोन लाख रुपयांची विमा कवच मिळवून देण्यात मदत करते व या योजनेचे नाव आहे पंतप्रधान सुरक्षा विमा योजना होय. ह्याच योजनेविषयीची महत्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेऊ.
वर्षाला 12 रुपये भरा आणि दोन लाख रुपयांचे विमा कवच मिळवा
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशातील नागरिकांसाठी अनेक लाभाच्या आणि कल्याणकारी योजना राबवल्या जात असून त्या योजनांचा लाभ घेणे खूप गरजेचे आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ही त्यातीलच एक महत्वपूर्ण योजना असून या माध्यमातून तुम्हाला दोन लाख रुपयांचे विम्याचे कवच प्रदान केले जाते. काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्ही सहजरीत्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता
जेव्हा तुम्ही या योजनेमध्ये सहभागी व्हाल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वर्षाला फक्त बारा रुपये या योजनेत जमा करावे लागतात. महिन्याच्या हिशोबाने पकडले तर एक महिन्याला एक रुपया यामध्ये तुम्हाला भरावा लागतो. वयाची 18 ते 70 वर्ष वय असलेली कोणताही भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या योजनेत कसे दिले जाते विम्याचे कवच?
यामध्ये विमाधारकाचा जर दुर्दैवी एखाद्या दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला किंवा पूर्णपणे अपंगत्व आले तर दोन लाख रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. मृत्यू झालेल्या पॉलिसीधारकाच्या किंवा विमाधारकांच्या वारसाला ही रक्कम मिळते. तसेच काही अंशी अपंगत्व आले तर एक लाख रुपयांची रक्कम या माध्यमातून देण्यात येते.
योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर संबंधित लाभार्थ्याला त्याच्या बँकेत असलेल्या कुठल्याही एका बचत खात्याची माहिती देणे गरजेचे असते व या बचत खात्यांमधून प्रत्येक महिन्याला एक रुपयाचा हप्ता म्हणजेच प्रीमियम वजा केला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर सगळ्यात अगोदर तुमच्या आधार कार्ड बँकेशी जोडणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी एक जून पूर्वी एक अर्ज भरून बँकेत द्यावा लागतो. या योजनेचा कालावधी एक वर्ष म्हणजेच एक जून ते 31 मे पर्यंत असतो. बँकेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षाला या योजनेचे नूतनीकरण म्हणजेच रिन्यूअल करून घेणे गरजेचे असते.
जर संयुक्त खाते बँकेत असेल तर सगळे खातेदारक या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. या योजनेत सहभागी होण्याकरिता एका बँक खात्याचाच वापर करावा लागतो. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेमध्ये जर रजिस्ट्रेशन करायचे असेल तर संबंधित खातेधारकाला त्याचे बचत खाते असलेले आपल्या संबंधित बँकेचे इंटरनेट बँकिंग सुविधेमध्ये लॉगिन करणे गरजेचे असते.
अशा साध्या पद्धतीने तुम्ही केवळ महिन्याला एक रुपया आणि वर्षाला बारा रुपये भरून दोन लाख रुपयांचे विमा कवच या योजनेच्या माध्यमातून मिळवू शकतात.