Post Office Scheme : आपल्यापैकी अनेकांनी आपल्याकडील बचतीचा पैसा कुठे ना कुठे गुंतवलेला असेल. काहीजण नजीकच्या भविष्यात आपल्याकडील बचतीचा पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीच्या तयारीत असतील.

जर तुम्हीही एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करू इच्छित असाल तर पोस्ट ऑफिसच्या बचत योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. पोस्ट ऑफिसच्या अशा काही बचत योजना आहेत ज्यामध्ये एफडी पेक्षा अधिकचे रिटर्न मिळत आहे.

Advertisement

दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण ज्या योजनेची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना प्रत्येक तीन महिन्यांनी दहा हजार 250 रुपयांची कमाई करता येणार आहे.

कोणती आहे ती बचत योजना?

Advertisement

पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून सीनियर सिटीजन सेविंग स्कीम म्हणजे SCSS नामक विशेष बचत योजना चालवली जात आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास ज्येष्ठ नागरिकांना एफडी पेक्षा अधिकचे व्याजदर मिळणार आहे. या योजनेत फक्त 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले नागरिकच गुंतवणूक करू शकणार आहेत. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस कडून 8.2% या वार्षिक व्याजदराने व्याज दिले जात आहे.

3 महिन्यात मिळणार दहा हजार 250 रुपये

Advertisement

पात्र गुंतवणूकदाराने या योजनेत 5 वर्षांच्या कालावधीसाठी 5 लाख रुपयांच्या गुंतवणुक केली तर त्याला प्रत्येक तीन महिन्यांनी दहा हजार 250 रुपये मिळणार आहेत. पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास मॅच्युरिटीवर एकूण ७.०५ लाख रुपये मिळणार आहेत.

यात 2.05 लाख रुपये व्याज राहणार आहे आणि उर्वरित पाच लाख रुपये ही त्याची स्वतःची गुंतवणूक राहणार आहे. म्हणजे मॅच्युरिटीवर व्याज आणि मूळ रक्कम मिळून 7.05 लाख रुपये एवढी रक्कम सदर गुंतवणूकदाराला मिळणार आहे.

Advertisement

प्रत्येक तिमाहीत म्हणजेच 3 महिन्यांनी व्याजातून मिळणारी कमाई 10250 रुपये एवढी राहणार आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सूटही मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेवर कर सूट उपलब्ध आहे.

तथापि, योजनेतील व्याजातून मिळालेल्या परताव्याचा आकडा 50,000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास टीडीएस लावला जातो. योजनेत 5 वर्षांच्या कालावधीसाठी 30 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जाऊ शकते, जी पुढील 3 वर्षांसाठी वाढवली देखील जाऊ शकते.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *