छोटी गुंतवणूकही तुम्हाला बनवणार लखपती ! एलआयसीच्या ‘या’ योजनेत दररोज 45 रुपयांची गुंतवणूक केली तर मिळणार 25 लाख रुपये, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

LIC Small Saving Scheme : तुम्हीही नजीकच्या भविष्यात एलआयसीच्या पॉलिसीमध्ये पैसे गुंतवण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग पॉलिसी काढण्याआधी आजचा हा लेख पूर्ण वाचा.

कारण की, आज आम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थातच एलआयसीमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत असणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. खरे तर एलआयसी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या अलीकडे खूपच वाढली आहे.

सुरक्षित गुंतवणुकीला महत्त्व दाखवणारे गुंतवणूकदार अलीकडे एलआयसीच्या वेगवेगळ्या पॉलिसीमध्ये पैसे लावत आहेत. एलआयसी देखील आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असते. LIC प्रत्येक वर्गातील नागरिकांसाठी पॉलिसी ऑफर करत आहे.

एलआयसी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनांच पॉलिसी उपलब्ध करून देत आहे. LIC ची पॉलिसी तुम्हाला संरक्षण आणि एक खात्रीशीर परतावा देत आहेत. दरम्यान आज आपण एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीची माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण ज्या योजनेची माहिती पाहणार आहोत त्यात गुंतवणूकदारांनी जर दररोज 45 रुपये सेविंग करून गुंतवणूक केली तर त्यांना मॅच्युरिटी वर तब्बल 25 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या पॉलिसीची सविस्तर माहिती.

कोणती आहे ती योजना

आम्ही ज्या पॉलिसी बाबत बोलत आहोत ती पॉलिसी आहे जीवन आनंद विमा योजना. LIC जीवन आनंद पॉलिसी अंतर्गत, तुम्ही दररोज सुमारे 45 रुपये वाचवू शकता आणि एका महिन्यात 1358 रुपये जमा करून 25 लाख रुपये मिळवू शकता.

या पॉलिसीचा कालावधी १५ ते ३५ वर्षे आहे. जर तुम्ही या पॉलिसी अंतर्गत दररोज ४५ रुपयांची बचत करून ३५ वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर या पॉलिसीची मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर तुम्हाला २५ लाख रुपये मिळतील. जर आपण वार्षिक आधारावर बचत केलेली रक्कम पाहिली तर ती सुमारे 16,300 रुपये राहणार आहे.

अशा प्रकारे, 35 वर्षांमध्ये गुंतवलेली एकूण रक्कम 5,70,500 रुपये होईल. तथापि, जर तुम्ही 35 वर्षांसाठी गुंतवणूक केली, तर तुमची विम्याची रक्कम रु. 5 लाख असेल, ज्यामध्ये मॅच्युरिटी कालावधीनंतर, तुम्हाला 8.60 लाख रुपयांचा रिव्हिजनरी बोनस आणि 11.50 लाख रुपयांचा अंतिम बोनस दिला जाईल.

LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये दोनदा बोनस दिला जातो, परंतु यासाठी तुमची पॉलिसी 15 वर्षांची असणे आवश्यक आहे. ही पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकाला या योजनेंतर्गत कोणत्याही कर सवलतीचा लाभ मिळत नाही,

परंतु यामध्ये तुम्हाला चार प्रकारचे रायडर्स मिळतात. यामध्ये अपघाती मृत्यू आणि अपंगत्व रायडर, अपघात लाभ रायडर, नवीन टर्म इन्शुरन्स रायडर आणि नवीन गंभीर लाभ रायडर यांचा समावेश आहे. डेथ बेनिफिट म्हणून नॉमिनीला पॉलिसीची १२५ टक्के रक्कम मिळणार आहे.

Leave a Comment