10th 12th Board Exam Timetable : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थातच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे.
खरेतर डिसेंबर महिना सुरु झाला की, विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेध लागते. कारण की नवीन वर्षात अगदी सुरुवातीलाच म्हणजेच जानेवारी महिन्यापासून दहावी आणि बारावीचे फायनल प्रॅक्टिकल सुरू होतात.
त्यानंतर मग विद्यार्थ्यांच्या फायनल परीक्षा अर्थातच बोर्ड एक्झाम आयोजित होत असतात. यंदा देखील विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे वेध लागले आहे.
आता दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. या बोर्ड परीक्षा अवघ्या दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपल्या आहेत.
दरम्यान, सीबीएससी बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड एक्झाम चे वेळापत्रक सार्वजनिक केले आहे. वेळापत्रक सार्वजनिक झाले असल्याने आता विद्यार्थ्यांना जोरदार तयारी करावी लागणार आहे.
आता विद्यार्थ्यांना त्यांनी केलेल्या अभ्यासाचे रिविजन करावे लागणार आहे. दरम्यान आता आपण सीबीएससी बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या एक्झाम केव्हा सुरू होतील आणि केव्हा संपतील हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थातच सीबीएससी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बोर्ड परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 ला सुरु होणार आहेत. मात्र दोघा वर्गांच्या परीक्षा वेगवेगळ्या तारखांना संपणार आहेत.
यात इयत्ता दहावीची परीक्षा 13 मार्चला आणि 12 वी ची 2 एप्रिलला संपणार अशी माहिती समोर आली आहे. ही परीक्षा दोन वेळांमध्ये होणार आहे. तथापि बोर्ड एक्झाम पूर्वी विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल द्यावे लागणार आहेत.
हे प्रॅक्टिकल जानेवारी महिन्यातच सुरू होणार आहे. 1 जानेवारीपासून प्रॅक्टिकलला सुरुवात होणार अशी माहिती समोर आली आहे.
एक जानेवारीला प्रॅक्टिकल्स सुरू होतील आणि 15 फेब्रुवारी पर्यंत संपूर्ण प्रॅक्टिकल्स पूर्ण होतील. यानंतर मग बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. cbse.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहता येणार आहे.