10th And 12th Marksheet Download : आजची ही बातमी विद्यार्थ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. ही बातमी दहावी आणि बारावीचे मार्कशीट हरवलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. कारण की आज आपण जर दहावी आणि बारावीचे मार्कशीट हरवलेले असेल आणि त्याचे झेरॉक्स देखील विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसेल तर अशावेळी दहावी आणि बारावीचे नवीन मार्कशीट कसे डाउनलोड करायचे ? या महत्वपूर्ण बाबीविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
दहावी आणि बारावीचे मार्कशीट कसे डाऊनलोड करावे
दहावी आणि बारावी बोर्डचे मार्कशीट पुढील वर्गात ॲडमिशन घेण्यासाठी, शिष्यवृत्तीचे फॉर्म भरण्यासाठी तसेच नोकरीसाठी आवश्यक असते. विविध सरकारी भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी ही दोन्ही डॉक्युमेंट महत्त्वाची मानली जातात.
पण, कोणत्याही नोकरीसाठी, कामासाठी आवश्यक असणारे हे डॉक्युमेंट जर हरवले तर काय करायचे हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतो. मात्र, आता अशा विद्यार्थ्यांनी अजिबात चिंता करायची नाही.
कारण की, दहावी आणि बारावीचे बोर्ड मार्कशीट आता सहजतेने तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येणार आहे. यासाठी तुम्हाला cbse.gov.in या वेबसाईटवर जावे लागणार आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला दहावी आणि बारावीचे सीबीएसई बोर्डाचे मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे. ही सीबीएसईची अधिकृत वेबसाईट आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम बोर्ड एक्झामिनेशन या पर्यायावर जायचे आहे.
येथे तुम्हाला डुप्लिकेट डॉक्युमेंट आणि करेक्शन या ऑप्शनवर जावे लागणार आहे. यानंतर प्रोसिजर अंड एप्लीकेशन यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर प्रोसिजर अँड एप्लीकेशन या पर्यायावर पुन्हा एकदा क्लिक करायचे आहे.
मग तुम्हाला डुप्लिकेट अकॅडमिक डॉक्युमेंट सिस्टम या पर्यायावर क्लिक करायचे आहे. मग कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. यानंतर प्रिंटेड डॉक्युमेंटच्या खाली असणाऱ्या पहिल्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती भरावी लागणार आहे. मग Search या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट शो केले जाईल. मग तुम्हाला ते मार्कशीट डाउनलोड करता येणार आहे.