कडक उन्हाळ्यात पावसाच्या धारा, महाराष्ट्रातील ‘या’ 5 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Havaman Andaj : राज्यातील अनेक भागात तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. काही भागात तर याहीपेक्षा अधिक तापमानाची नोंद केली जात आहे. एकीकडे राज्यात तापमान वाढीमुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक अक्षरशा हैराण झाले आहेत. मात्र मार्च महिन्याची एंडिंग अवकाळी पावसाने झाली.

दुसरीकडे आता एप्रिलची सुरुवात देखील अवकाळी पावसाने  होणार असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आगामी 24 तासात राज्यातील काही भागात तुरळक ठिकाणी अवकाळी हजेरी लावणार असा अंदाज दिलाय.

राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार तर काही भागात पाऊस बरसणार आहे. आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार आज दोन एप्रिल 2024 ला राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.

तसेच राज्यातील सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच आगामी पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील नुकसान होईल अशी भीती व्यक्त होत आहे.

कसं राहणार देशातील हवामान

सध्या पश्चिम बंगाल मध्ये चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगाल राज्यातील जलपाईगुडी येथे चक्रीवादळ, वादळ, पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आतापर्यंत पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो लोक यामुळे जखमी झाले आहेत.

घरांचे, दुकानांचे, झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामुळे तेथे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची नोंद करण्यात आले आहे. दरम्यान या साऱ्या परिस्थितींचा तेथील राज्य सरकारने आढावा घेतला असून आपत्तीग्रस्तांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

कसा राहणार आगामी मान्सून

गेल्या मान्सून मध्ये देशात खूपच कमी पाऊस झाला. शिवाय ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागात अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे आगामी मान्सून कसा राहणार हा मोठा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान हवामान तज्ञांनी मान्सून 2024 मध्ये अर्थातच जून ते सप्टेंबर 2024 मध्ये देशात समाधानकारक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस राहू शकतो असा अंदाज हवामान तज्ञांनी दिलेला आहे. काही हवामान संस्थांनी यावर्षी मान्सूनवर एल निनोचे सावट राहणार नाही.

तसेच ला निना साठी पूरक वातावरण तयार होईल आणि इंडियन ओशियन डायपोल देखील पॉझिटिव्ह राहील असे म्हटले आहे. यामुळे यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होणार असा अंदाज आहे. निश्चितच असे झाले तर देशभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment