बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला मिळणार 12वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

12th Board Exam Hall Ticket : महाराष्ट्रातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर विद्यार्थी वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहत असतात ती बोर्ड परीक्षाची वेळ आता जवळ आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतं आहे.

अशातच या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेत संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. जस की आपणास ठाऊकच आहे की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च महिन्यात बारावी बोर्ड परीक्षा घेतली जाते.

यावर्षी देखील या नियोजित वेळेत बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच आता बोर्ड परीक्षेसाठी अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

अशा परिस्थितीत या संबंधित विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट केव्हा जाहीर होणार हा सवाल उपस्थित केला जात होता.

दरम्यान या बारावी बोर्ड परीक्षेसाठी येत्या सोमवारपासून अर्थातच 22 जानेवारी 2024 पासून हॉल तिकीट वितरित होणार असल्याची माहिती मंडळाच्या माध्यमातून समोर आली आहे.

यामुळे आता विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी कसून अभ्यासाला सुरुवात करावी लागणार आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च प्राथमिक शाळेच्या माध्यमातून हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

मंडळांनी राज्यातील सर्व उच्च प्राथमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावी परीक्षेचे ऑनलाईन प्रवेश पत्र प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विशेष म्हणजे या हॉल तिकीटसाठी अर्थातच प्रवेश पत्रासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेच शुल्क आकारले जाऊ नये असे देखील मंडळांने स्पष्ट केले आहे.

दरम्यान प्रवेश पत्रावर मुख्याध्यापकांचा किंवा प्राचार्यांचा सही आणि शिक्का मारण्याच्या सूचना देखील संबंधित शाळा आणि कॉलेजेसला देण्यात आल्या आहेत. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रात म्हणजेच हॉल तिकीट मध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

तसेच जर विद्यार्थ्यांकडून प्रवेश पत्र हरवले असेल तर अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश पत्र प्रिंट करून त्यावर द्वितीय प्रत असा शेरा मारून पुन्हा ते हॉल तिकीट सदर विद्यार्थ्याला वितरित केले जावे अशा महत्त्वाच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment