7th Pay Commission : केंद्रातील सरकारने 1 जानेवारी 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. जानेवारीपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढला आहे. यानुसार हा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर गेला आहे. आधी हा भत्ता 46% एवढा होता. याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला मात्र याची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून होणार आहे.

दरवर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एका वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जात असते. पहिली वाढ जानेवारी महिन्यापासून लागू होते आणि दुसरी वाढ जुलै महिन्यापासून लागू होते.

Advertisement

यानुसार 2024 मध्ये जानेवारी महिन्यापासून चा महागाई भत्ता वाढला असून केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता 50 टक्के या दराने महागाई भत्ता म्हणजे डीए दिला जात आहे.

केंद्रीय पेन्शन धारकांचा महागाई भत्ता अर्थातच डीआर देखील 50% झाला आहे. दुसरीकडे महागाई भत्ता 50% झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता आणि इतर 12 प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ झाली आहे.

Advertisement

4 जुलै 2024 रोजी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) या संदर्भात एक सर्क्युलर म्हणजेच परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार सरकारी कर्मचाऱ्यांचे 13 प्रकारचे भत्ते 25 टक्क्यांनी वाढवले जाणार आहेत.

तसेच हि वाढ एक जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. आता आपण चार जुलैच्या या परिपत्रकानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचे कोणकोणते भत्ते वाढले आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कोण कोणते भत्ते वाढलेत ?

स्थान भत्ता, वाहन भत्ता, अपंग महिलांच्या मुलांसाठी विशेष भत्ता, मुलांचा शिक्षण भत्ता, घरभाडे भत्ता किंवा एचआरए, हॉटेल निवास, शहरातील प्रवासासाठी प्रवास शुल्क (प्रेक्षणीय स्थळे), भोजन शुल्काची प्रतिपूर्ती, एकरकमी किंवा दैनंदिन भत्ता, किंवा स्वत:च्या कार/टॅक्सी, ऑटो रिक्षा, स्वत:ची स्कूटर इ.ने केलेल्या प्रवासासाठी जेथे संबंधित राज्याच्या किंवा शेजारच्या राज्याच्या परिवहन संचालकांनी विशिष्ट दर निर्धारित केलेला नाही, हस्तांतरण इत्यादीवरील वैयक्तिक परिणामांच्या वाहतुकीचा दर, ड्रेस भत्ता, विभाजन शुल्क भत्ता आणि प्रतिनियुक्ती (कर्तव्य) भत्ता या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. हे वाढीव भत्ते एक जानेवारीपासून लागू राहणार आहेत.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *