Banking News : नुकत्याच दोन दिवसांपूर्वी आरबीआयने उत्तर प्रदेश मधील एका सहकारी बँकेचे लायसन्स रद्द केले होते. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश मधील बनारस मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक या सहकारी बँकेचा चार जुलैला परवाना रद्द केला होता. याआधी म्हणजे जून महिन्यात आरबीआयने गाजीपुर येथील पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह बँक आणि आपल्या महाराष्ट्रातील येथे मुंबई स्थित सिटी को-ऑपरेटिव्ह बँक या दोन सहकारी बँकांचा परवाना रद्द केला होता.

दरम्यान आता काल आरबीआयने आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार काल पाच जुलै 2024 ला आरबीआय ने कर्नाटकस्थित एका बड्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे.

Advertisement

काल मध्यवर्ती बँकेने कर्नाटकस्थित शिमशा सहकार बँक नियमित, मद्दूर या बँकेचा परवाना रद्द केला आहे. सदर बँकेची आर्थिक स्थिती ढासळल्याने त्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे. 5 जुलै 2024 रोजी बँकेचे कामकाजाचे तास संपल्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाने सदर बँकेला बँकिंग व्यवसाय करण्यास बंदी घातली आहे.

यासोबतच कर्नाटकच्या सहकारी संस्थांच्या निबंधकांना ही सहकारी बँक बंद करण्याचे आदेश जारी करून बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. यामुळे बँकेच्या खातेधारकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.

Advertisement

ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. यामुळे आता आपण या सहकारी बँकेचे लायसन्स रद्द झाले असल्याने या बँकेतील ठेवीदारांच्या पैशांचे काय होणार याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेच्या प्रत्येक ठेवीदाराला ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून त्याच्या ठेवींवर 5 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्याची रक्कम मिळण्याचा अधिकार राहणार आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना RBI ने असे म्हटले आहे की, या सहकारी बँकेच्या सुमारे 99.96 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.

Advertisement

सदर सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्याने या बँकेने बँकिंग व्यवसाय सुरू ठेवला असता तर सर्वसामान्य ग्राहकांचे नुकसान होण्याची भीती होती.

यामुळे ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी सदर बँकेचा परवाना रद्द करण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाने घेतला आहे. आरबीआयच्या या कारवाईमुळे मात्र सदर बॅंकेच्या ठेवीदारांमध्ये थोडेसे पॅनिक वातावरण आहे.

Advertisement

मात्र जाणकार लोकांनी सदर बँकेच्या ठेवीदारांना पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळवण्याचा अधिकार असल्याने ग्राहकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे.

Advertisement

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *