7th Pay Commission DA : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा महागाई भत्ता बाबत आहे. खरंतर सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरु आहे. येत्या तीन दिवसात देशात नवरात्र उत्सवाला सुरवात होणार आहे.
यानंतर पुढल्या महिन्यात संपूर्ण देशभरात दिवाळीचा सण साजरा होईल. यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान या आनंदाच्या वातावरणात सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार आहे. केंद्र शासन ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी एक मोठा निर्णय घेणार आहे. जुलै महिन्यापासूनच्या महागाई भत्त्यात सुधारणा केली जाणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होईल याबाबतचा निर्णय घेतला जाईल. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात याबाबत केंद्र शासनाकडून निर्णय घेतला जाणार अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. तूर्तास मात्र अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकेच्या आकडेवारीनुसार DA मध्ये चार टक्के वाढ होणे अपेक्षित आहे.
मात्र याबाबतचा अंतिम निर्णय हा केंद्रशासन घेणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा फायनल निर्णय घेतला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढला तर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते ? याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
किती वाढणार पगार ?
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के प्रमाणे महागाई भत्ता मिळत आहे. यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे. म्हणजेच महागाई भत्ता 46% एवढा होईल. याची अंमलबजावणी एक जुलै 2023 पासून होणार असून याचा प्रत्यक्ष रोखीने लाभ ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजेच जे वेतन नोव्हेंबर महिन्यात मिळेल त्या वेतना सोबत दिला जाणार आहे.
यामुळे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आता आपण कर्मचाऱ्यांचा पगार किती रुपयांनी वाढणार याबाबत थोडक्यात समजून घेऊया.
जर समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार हा 56 हजार 900 रुपये आहे तर अशा कर्मचाऱ्याला सध्या लागू असलेल्या 42% महागाई भत्ता प्रमाणे 23 हजार 898 रुपये एवढा महागाई भत्ता मिळत आहे. पण जर यामध्ये चार टक्के वाढ झाली म्हणजेच 46 टक्के महागाई भत्ता झाला तर सदर कर्मचाऱ्याला 26 हजार 174 रुपये एवढा महागाई भत्ता मिळणार आहे.
म्हणजेच सदर कर्मचाऱ्यांच्या मंथली पगारात 2276 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर विचार केला असता सदर कर्मचाऱ्याला 27 हजार 312 रुपये एवढी वार्षिक पगार वाढ यामुळे मिळणार आहे.