7th Pay Commission DA Hike : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा झाला आहे. गेल्या महिन्यात अर्थातच 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 दरम्यान यावर्षी गणेशोत्सवाचा सण साजरा करण्यात आला आहे.
दरम्यान या चालू महिन्यात अर्थातच ऑक्टोबर महिन्यात देखील विविध सणांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये देशात नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव आणि विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण ऑक्टोबरमध्ये साजरा होणार आहे.
दरम्यान या सणापूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीची भेट दिली जाणार आहे.
किती वाढणार महागाई भत्ता
जसं की आपणास ठाऊकच आहे की सध्या स्थितीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जानेवारी महिन्यात चार टक्के वाढ केल्यानंतर महागाई भत्ता 42 टक्के एवढा झाला आहे. आता जुलै महिन्यापासून यामध्ये आणखी चार टक्के वाढ होणार आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्क्यांवरून 46 टक्के एवढा होणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू होणार आहे तसेच याबाबतचा निर्णय या चालू महिन्यात होण्याची शक्यता आहे. अद्याप केंद्रशासनाने याबाबत कोणतीच माहिती दिलेली नाही.
मात्र विजयादशमीपूर्वी अर्थातच दसऱ्याच्या पूर्वी केंद्र शासनाकडून एक महत्त्वाची बैठक घेतली जाईल आणि सदर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यासाठी चार टक्के डीएवाढीची घोषणा केली जाईल असा दावा एका मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा रोखीने लाभ ऑक्टोबर महिन्याच्या (पेड इन नोव्हेंबर) वेतनासोबत दिला जाणार आहे. साहजिकच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यामुळे सणासुदीच्या दिवसात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी भेट राहणार असल्याचे मत आता व्यक्त होऊ लागले आहे.