Business Success Story : जे लोक परिस्थितीशी दोन हात करतात, आपल्या वाटेला आलेल्या संकटांचा यशस्वी मुकाबला करतात ते लोक निश्चितच यशस्वी होतात. तुम्ही यशस्वी लोकांची अनेक उदाहरणे पाहिली असतील. पण आज आपण अशा एका अवलियाची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने गरीबीशी दोन हात करत हजारो कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे.

एकेकाळी शिपाई म्हणून काम करणाऱ्या अवलियाने आज 3,000 कोटी रुपयांची कंपनी उभी केली असून संपूर्ण देशातील तरुणांसाठी ते आज एक प्रेरणास्थान बनले आहेत. आम्ही ज्या अवलियाविषयी बोलत आहोत ते आहेत फेविकॉल तयार करणारे फेविकॉल म्हणजे पिडीलाईट कंपनीचे संस्थापक बळवंत पारेख.

Advertisement

पारेख यांचा जन्म 1925 मध्ये गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्याच्या महुआ या छोट्याशा गावात झाला. बलवंत पारेख यांची आर्थिक परिस्थिती म्हणावी तशी खास नव्हती. त्यांचे कुटुंब मध्यमवर्गीय होते. आर्थिक परिस्थिती बेताची होती. मात्र त्यांच्या मनातली इच्छाशक्ती बेताची नव्हती.

त्यांनी गावात आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी मुंबईची वाट धरली. मायानगरी मुंबईमध्ये शेकडो स्वप्न घेऊन पारेख दाखल झालेत. खरंतर दहा पैकी सात गुजराती व्यवसायात उतरताना दिसतात. पारेख यांना देखील व्यवसायाचीच आवड होती. मात्र घरच्यांना त्यांनी नोकरी करावी असे वाटत असे यामुळे त्यांनी घरच्यांच्या आग्रहास्तव कायद्याचे शिक्षण घेतले.

Advertisement

मात्र कायद्याच्या शिक्षणानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली नाही. शिक्षणादरम्यानच पारेख यांचे लग्न झाले. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढल्यात यामुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. त्यांनी सुरुवातीला डाईंग आणि प्रिंटिंग प्रेस मध्ये नोकरी सुरू केली. मात्र या प्रिंटिंग प्रेस मध्ये त्यांनी थोडेच दिवस नोकरी केली आणि त्यानंतर एका लाकूड व्यापाऱ्याकडे काम सुरू केले. येथे त्यांनी शिपाई म्हणून काम केले.

विशेष म्हणजे येथे काम करताना ते आपल्या पत्नी समवेत गोदामातच राहू लागले. येथे राहताना त्यांनी लाकडाचे काम जवळून पाहिले. दरम्यान काही काळानंतर त्यांनी लाकूड व्यापाऱ्याकडील काम सोडले आणि यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या केल्या. दरम्यानच्या काळात त्यांची एका गुंतवणूकदाराशी भेट झाली आणि तेथून मग खऱ्या अर्थाने त्यांच्या व्यवसायाची सुरुवात झाली.

Advertisement

सदर गुंतवणूकदाराच्या मदतीने त्यांनी आयातीचा धंदा सुरू केला. पाश्चिमात्य देशांतून सायकली, सुपारी, कागदी रंग यासारख्या वस्तू ते भारतात आयात करू लागले. दरम्यान हा व्यवसाय करत असताना ते जर्मन कंपनी Hoechst च्या संपर्कात आले. यामुळे त्यांना जर्मनीला जाण्याची संधी देखील मिळाली. ते जर्मनीहून परतले आणि तेथून त्यांनी आपल्या भावासोबत नवीन व्यवसायाची मुहूर्तरोढ रोवली.

त्यांनी आपल्या भावासोबत मिळून डायकेम इंडस्ट्रीज नावाची कंपनी सुरू केली. त्यांची कंपनी मुंबईच्या जेकब सर्कलमध्ये सुरु झाली. ही कंपनी रंग, औद्योगिक रसायने, रंगद्रव्य इमल्शन युनिटचे उत्पादन व व्यापार करायची. या कंपनीमुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळाली. कंपनीतून त्यांना चांगली कमाई होऊ लागली.

Advertisement

मात्र ज्यावेळी ते शिपाई म्हणून लाकडाच्या गोदामात कामाला होते त्यावेळी त्यांनी लाकूड चिकटवण्यासाठी कारागिरांना किती मेहनत घ्यावी लागते हे जवळून पाहिले होते. यामुळे, त्यांनी लाकूड चिटकवण्यासाठी गम बनवण्याचा निर्णय घेतला. हा त्यांचा निर्णय खऱ्या अर्थाने टर्निंग पॉईंट ठरला. 1959 मध्ये त्यांनी फेविकॉल लॉन्च केले. विशेष म्हणजे फेविकॉल हा मजबुतीचा जोड ग्राहकांच्या पसंतीस खरा उतरला आणि गेल्या सहा दशकांपासून हा मजबुतीचा जोड आजही मजबूतच आहे.

पुढे जाऊन कंपनीचे नाव पिडिलाईट ठेवण्यात आले. आजच्या घडीला ही कंपनी 56 देशांमध्ये आपला व्यवसाय करत आहे. विशेष म्हणजे कंपनीची उलाढाल तब्बल 3000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. निश्चितच जर मनात यशस्वी होण्याची बळकट इच्छा असेल तर कोणत्याही क्षेत्रात बळवंत होता येऊ शकते हेच बळवंतजी यांच्या उदाहरणावरून सिद्ध होत आहे.

Advertisement

Santosh Kumar is an accomplished journalist known for his insightful and impactful reporting. With over a decade of experience in the field Kumar's work has been featured in several leading newspapers...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *