7th Pay Commission : जर तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच खास राहणार आहे. खरंतर, सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्क्यांवर पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50% एवढा करण्यात आला.
याचा रोख लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांना जरी मार्च 2024 पासून मिळत असला तरी देखील ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली आहे. अर्थातच सदर कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील मिळालेली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो. जानेवारी आणि जुलै महिन्यापासून महागाई भत्ता सुधारित होत असतो. जानेवारी 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित झाला आहे. यानुसार महागाई भत्ता 50 टक्के झाला आहे.
आता जुलै 2024 पासूनचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार असून याच संदर्भात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी पुन्हा एकदा महागाई भत्तात चार टक्क्यांची मोठी वाढ केली जाणार आहे.
म्हणजेच महागाई भत्ता (DA) 54 टक्क्यांवर पोहोचणार आहे. याचा लाभ जुलै 2024 पासून लागू केला जाणार आहे. जानेवारी 2024 पासून 30 जून 2024 चा चार्ट पाहिला तर त्या आधारे डीए किमान 4 टक्के वाढेल असा विश्वास स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी व्यक्त केला आहे.
म्हणजेच यावेळी देखील महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. जुलै 2024 पासून महागाई भत्ता 54 टक्के एवढा होऊ शकतो असा अंदाज जाणकार लोकांनी वर्तवला आहे.
तथापि याबाबतचा निर्णय हा सप्टेंबर 2024 मध्येच घेतला जाईल असे म्हटले जात आहे. आतापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता केंद्रातील सरकार सप्टेंबर महिन्यात जुलै महिन्यापासूनचा महागाई भत्ता सुधारित करत असते.
यामुळे सप्टेंबर 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 54% करण्याचा अधिकृत निर्णय केंद्रातील सरकारकडून घेतला जाईल असे म्हटले जात आहे.
महागाई भत्त्यात आणखी चार टक्क्यांची वाढ झाली तर सदर नोकरदार वर्गाच्या पगारात ही चांगली वाढ होणार आहे. यामुळे सदर मंडळीला या महागाईच्या काळात मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे.