केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून चार टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के एवढा डीए मिळत असून हा DA जुलै 2024 पासून 54 टक्क्यांवर जाईल असा विश्वास व्यक्त होत आहे. स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी. श्रीकुमार यांनी सुद्धा जुलै 2024 पासून महागाई भत्ता 54 टक्के एवढा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

यावेळी त्यांनी आठव्या वेतन आयोगाच्या समितीसंदर्भात देखील महत्वाची माहिती दिली आहे. खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून मीडिया रिपोर्टमध्ये आठवा वेतन आयोगाबाबत चर्चा आहेत. वेतन आयोगाचा आत्तापर्यंतचा ट्रेंड पाहिला असता तर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होत असतो.

2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू झाला होता. यामुळे आता 2026 पर्यंत नवीन आठवा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. हेच कारण आहे की कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

अशातच आता स्टाफ साइडच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य सी श्री कुमार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारकडे आठवा वेतन आयोगासाठी आवश्यक असलेल्या समितीच्या स्थापनेची मागणी केली जाईल अशी माहिती यावेळी दिली आहे.

एकंदरीत लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटना सरकारवर आठवा वेतन आयोगासाठी दबाव तयार करणार आहेत. खरंतर, इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशन म्हणजेच आयआरटीएसएसने आधीच यासंदर्भात केंद्राकडे मागणी केली आहे.

या संस्थेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे आठवा वेतन आयोग समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांना माजी वेतन आयोगाने केलेल्या शिफारसींचा दाखला देण्यात आला आहे.

मात्र सरकारने आठवा वेतन आयोगा संदर्भात अजून कोणतीच ठोस भूमिका घेतलेली नाहीये. याउलट केंद्रीय अर्थराज्यमंत्री महोदय यांनी आठवा वेतन आयोग लागू करणे बाबतचा प्रस्ताव सध्या तरी केंद्राच्या सरकार पुढे विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.

त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. तथापि अनेक जाणकार लोकांनी आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आणखी वेळ आहे.

यामुळे आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय नजीकच्या काळात सरकारकडून घेतला जाऊ शकतो. लोकसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर केंद्रातील सरकार आठवा वेतन आयोगाबाबत निर्णय घेईल अशी आशा व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना देखील लोकसभा निवडणुकीनंतर आठवा वेतन आयोगाच्या समितीसाठी पाठपुरावा करणार आहे. यामुळे सरकारवर दबाव बनेल आणि सरकार आठवा वेतन आयोग संदर्भात सकारात्मक निर्णय घेईल असे म्हटले जात आहे.

Leave a Comment